ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी, प्रा. शेखर प्यारमवार

भारतीय जनता पार्टी तालुका सावली च्या वतिने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुधिर मुनगंटीवार वने व पर्यावरण मत्स्य मंत्री तथा पालकमंत्री यांच्या व माजी आमदार अतुल देशकर यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन दिनांक २७ जुलै गुरुवारला सकाळी रक्तदान शिबिर व गुणवंत विद्यार्थी सत्कार कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी रक्तदान करुन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करुन जन्मदिवस साजरा करण्यात आला.रक्तदान शिबीर उपक्रम भाजपा तर्फे सावली तालुक्यात सतत बारा वर्षे निरंतर चालु असून समाजकार्यास भाजपा पदाधिकाऱ्यांचे मोठया प्रमाणात योगदान चालु आहे.
त्यावेळी मा माजी आमदार अतुल देशकर यांनी सावली येथे भेट दिली.त्यांच्या समक्ष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.त्यानंतर माजी आमदार अतुल देशकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे मनापासुन आभार मानले.
त्यावेळी संजय गजपुरे जिल्हा महामंत्री,अविनाश पाल, तालुका महामंत्री सतीश बोम्मावार,माजी सभापती संतोष तंगडपल्लीवार, आशिष कार्लेकर,प्रकाश गड्डमवार, देवरावजी मुद्दमवार, अशोक आकुलवार, किशोर वाकुडकर, सचिन तंगडपल्लीवार,राकेश गोलेपल्लीवार,अर्जुन भोयर,अरुन पाल,विनोद धोटे,अंकुश भोपये, राकेश कोनबतुलवार, डॉ.कवठे,किष्णाजी राऊत,राकेश विरमलवार,गौरव संतोषवार, अनिल माचेवार,विठ्ठल येगावार, राहुल लोडेलीवार,इम्रान शेख, आशिष संतोषवार,प्रसाद जक्कुलवार,प्रकाश खंजाजी, रविंद्र बोल्लीवार,मयुर गुरुनुले, निलमताई सुरमवार,छायाताई शेंडे,शारदा गुरनुले नगरसेविका,गुड्डी सहारे शहर अध्यक्ष,योगीताताई,प्रतीभाताई बोबाटे,मनिषाताई चिमुरकर,पुष्पाताई शेरकी,शिंदुताई मराठे, शोभाताई बाबनवाडे तसेच गडचिरोलीची वैद्यकीय टीम डॉ.सिद्धी शृंगी, डॉ.सुबुद नसेरी,सतीश तडकलावार, राहुल वाळके,निलेश सोनवणे,राहुल सिडाम,प्रमोद देशमुख, बंडू कुंभारे, कू.प्राची,कू.वैभवी, कू.स्नेहल गेडाम,भा ज पा कार्यकर्ते व पदाधिकारी,महिला पदाधिकारी उपस्थित होते.या कार्यक्रमच्या यशस्वीतेसाठी सतिश बोम्मावार, आशिष कार्लेकर,निखिल सुरमवार, यांनी अथक परिश्रम घेतले होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा राऊत यांनी केले तर आभाप्रदर्शन सौ.निलमताई सुरमवार यांनी मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये