Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

एड्सशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनजागृती – कॅप्टन मोहन गुजरकर

जागतिक एड्स दिवस संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी :’एड्स आजार बरा होऊ शकत नाही केव्हा समाजातून नाहीसा करता येत नाही. पण योग्य काळजी घ्या व नैतिक मूल्यांची रूजवण केल्यास एड्सवर मात करता येऊ शकते. एड्स शी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे जनजागृती होत, असे प्रतिपादन १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनाच्या पर्वावर आयोजित कार्यक्रमात एनसीसी अधिकारी तथा राष्ट्रीय सेवा योजना चे समन्वयक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी केले.

२१ महाराष्ट्र एनसीसी बटालियन अंतर्गत स्थानिक एस एस एन जे महाविद्यालयातील एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजना युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक एड्स दिवस’ एनसीसी सभागृहात संपन्न झाला.

याप्रसंगी एनसीसी छात्र सैनिकांनी एकमेकांना ‘लाल रिबीन’ बांधून एड्सच्या धोक्यापासून सुरक्षा तथा इतरांकरीता जनजागृती निर्माण करण्याची शपथ घेतली.

याप्रसंगी एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर यांनी एड्स या विषयावर मार्गदर्शन केले. अंडर ऑफिसर श्रद्धा मडावी, मनीषा मडकाम, सुजल पराते, मनोज नेहारे, साक्षी येळणे, कांचन राऊत, रितेश बुटे व खुशी पचारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन सार्जंट कोमल शितळे तर आभार अंडर ऑफिसर आदर्श नाईक याने मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये