ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाजकार्य विद्यार्थ्यांनी संबोधन ट्रस्टला दिली भेट

चांदा ब्लास्ट

स्व. सुशिलाबाई रामचंद्रराव मामीडवार कॉलेज ऑफ सोशल वर्क, पडोली, चंद्रपूर येथील  एम.एस.डब्ल्यू व्दितीय वर्षाच्या वैद्यकिय व मन: चिकित्सक  समाजकार्य विशेषीकरणाच्या विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी संबोधन ट्रस्ट, तुकुम, चंद्रपूर येथे एक्सप्लोझर भेट दिली.
L.G.B.T समुदायात असणाऱ्या अनेकांना समाज आजही स्वीकारत नाही. मात्र या समुदायात असणाऱ्या व्यक्तींच्या अनेक समस्या असतात. ही बाब संस्थेचे अध्यक्ष राज काचोडे यांच्या लक्षात आली. त्यांना योग्य वेळी योग्य सल्ला, मार्गदर्शन गरजेचे वाटू लागल्याने 2011 पासुन संबोधन ट्रस्ट संस्थेची सुरुवात केली. या समुदायात असणाऱ्या व्यक्तींना शासनाच्या योजनांचा लाभ, आरोग्यविषयक सुविधा, रोजगार व समाजात मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून केले जाते. आजवर अनेकांना याचा मिळवून देण्यात आला आहे. राज अलोने, अलोक रॉय, ज्ञानेश्वर सोनवाणे यांनी समाजकार्य विद्यार्थ्यांना संस्थेची माहिती दिली.
संस्था भेट समन्वयक प्रा. डॉ. जयश्री कापसे व प्रा. डॉ. देवेंद्र बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थी एक्सप्लोझर संस्था भेटी देत आहेत. यावेळी संचालन स्वप्नील मेश्राम व आभार महिमा मोहुर्ले यांनी व्यक्त केले.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये