ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुलावरील पडलेली भागदाळे देत आहेत धोक्याची घंटा

सावली - हरणघाट मार्गाची व्यथा ; संबधित विभागाचे दुर्लक्ष ; अपघाताची शक्यता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

वाहनाची वर्दळ पावसाचा तड़ाखा आदि कारनास्थव संपूर्ण सावली – हरणघाट मार्गची वाट लागली असून रस्त्यावर निर्माण झालेली मोठा मोठी भगदाळे धोक्याची घंटा देते अपघाताला आमंत्रण देणारी ठरत आहेत सावली ते हरणघाट मार्गावरील असलेल्या पुलियाला मोठं मोठे दोन भगदाड पडल्यामुळे या पुलियावर मोठा अपघात घडण्याची शक्यता आहे.मात्र अशा गंभीर बाबीकडे संबधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत असल्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.

सावली तालुक्यातील रुद्रापूर, कवठी, पारडी ही गावे गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेलगत आहेत विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थानाला भाविक भक्तांची नेहमी वर्दळ असते आणि हरणघाट ला श्री मुरलीधर कार्तिक स्वामी महाराज यांचे मंदिर असल्यामुळे तिथे सुद्धा भाविक भक्तांची वर्दळ असते आणि या खेडेगावातील लोकांना विध्यार्थ्यांना, शिक्षकांना नेहमी तालुक्याला जाण्यासाठी हा एक मेव मार्ग आहे.

मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची अवस्था बिकट होती परंतु नागरिकांच्या मागणीमुळे या रस्त्याला डांबर मिळाला या मार्गाला लहान लहान पुलियां निर्माण करण्यात आले परंतु सध्या या पुलियांचे स्थिती जीर्ण अवस्थेत आले असल्यामुळे या पुलियांच्या चारही बाजूंनी मोठं मोठे भगदाड पडताना दिसून येत आहे.

त्या मुळे ये जा करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे तरी पण या पुलियाकडॆ संबधित विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे एखादा अपघात झाला असता ते भगदाड बुजवणार का असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत.
या बाबीकडे लोक प्रतिनिधीनी लक्ष पुरवून नवीन पुलिया बांधकाम करण्यासाठी पाठ पुरावा करावा अशी मागणी जोर धरीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये