ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पी.एम. श्री योजने करिता पहिल्या टप्प्यात चंद्रपूर जिल्ह्यातील 19 शाळांची निवड

उपक्रमात वडगाव शाळेचे शिक्षक व जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य यांचा सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

केंद्र शासन पुरस्कृत आणि शालेय शिक्षण विभाग व साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालय नवी दिल्ली मार्फत आयोजित तीन दिवसीय प्रशिक्षण एनसीईआरटी नवी दिल्ली येथे नुकतेच संपन्न झाले यामध्ये पीएम श्री योजनेच्या निवडलेल्या एकोणवीस शाळांपैकी दोन प्रतिनिधी स्वरूपात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव येथील सहाय्यक शिक्षक काकासाहेब बाबुराव नागरे व तळोदी बाळापूर येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य एम मीना यांची निवड करण्यात आली होती त्यांनी सदरील प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले केले तसेच या योजनेच्या योग्य अंमलबजावणीसाठी दिनांक 19 ते 21 ऑक्टोबर या दरम्यान राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेमध्ये पीएम श्री योजना व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार एकूण सहा स्तरावर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तसेच शाळेला आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधा व शाळा डिजिटल करण्यासाठी आणि मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समिती पालक व उत्पादक समाज यांच्या माध्यमातून केंद्र शासन व राज्य शासन यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी कशी प्रयत्न योजना तयार करता येईल

याबद्दल या कार्यशाळेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली कौशल भारत कुशल भारत फिट इंडिया विज्ञान व तंत्रज्ञान दैनंदिन अध्यापनामध्ये तंत्रज्ञानाचा स्मार्ट पद्धतीने उपयोग कसा करावा विविध शैक्षणिक एप्लीकेशनचा वापर याबाबत या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेमध्ये सविस्तर माहिती देण्यात आल्याचे सदर प्रशिक्षणार्थींनी आपल्या मनोगतात सांगितले आहे प्रशिक्षणा दरम्यान दिल्लीमधील केंद्रीय विद्यालय व पीएम श्री योजनेची संबंधित सर्व महत्त्वपूर्ण स्थळांना भेटी देण्याचे नियोजन देखील करण्यात आले होते शासन स्तरावरील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून या उपक्रमाच्या माध्यमातून शाळा आदर्श शाळा ठरेल व शैक्षणिक गुणवत्ता उंचावेल असे देखील प्रशिक्षणार्थी सांगितले आहे दोन्ही प्रशिक्षणार्थ्यांना डॉक्टर दिनेश प्रसाद सकलानी संचालक एनसीईआरटी यांच्या हस्ते उत्कृष्ट सहभाग बद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्यातून आलेले 35 सहभागी मुख्याध्यापक व जम्मू काश्मीर अरुणाचल प्रदेश बिहार दादरा नगर हवेली गुजरात सिलवास लेह लडाख या राज्यातील 120 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रशिक्षणार्थ्यांनी या प्रशिक्षणाची संधी दिल्याबद्दल जिल्हा परिषद चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉनसन शिक्षणाधिकारी प्राथमिक राजकुमार हिवारे व समग्र शिक्षा अभियान चे जिल्हा समन्वयक प्रकाश भोयर यांचे आभार व्यक्त केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये