ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी आरक्षण हे खिरापत नाही., उगाचच डिवचू नका!

जिवती येथिल मोर्चात आदिवासीचा शासनाला इशारा...

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती – सत्ता आणि संपत्तीचा गैरवापर करून दोन समुहात भांडणे लावता येते, परंतु आरक्षण देताना कायद्याच्या चौकटीत राहूनच द्यावे लागते.आदिवासी आरक्षण म्हणजे खिरापत नव्हे, जे पार्टीची पदे,मंडळाची पदे वा निवडणुकीतील तिकीटे वाटप करतात तशी करायला.आदिवासी समाज शांत आहे म्हणून डिवचण्याचा प्रयत्न करू नका.जंगलातील या वाघाला उगाचच डिवचल्यास तुम्हाला सळो की पळो केल्या शिवाय राहणार नाही,असा इशारा जिवती येथिल मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना बापुराव मडावी, भीमराव पाटील मडावी, युवा नेते गजानन पा.जुमनाके यांनी राज्यकर्त्यांना दिला.

      धनगर या एका जाती साठी असलेले भटक्या जमातीचे साडेतीन टक्के आरक्षण खुशाल वाढवून मागावे, आमचा नकार नाही.मात्र ते आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नसतांना आमचा वाटा मागण्याच्या भानगडीत पडू नये.राज्यकर्त्यांनी धनगरांना आकाशातील चांदणे दाखविण्यापेक्षा शासनाने नेमलेल्या संशोधन समितीचा २००६ चा आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टिस) मुंबई २०१८ चा अहवाल दाखवावा व सत्य सांगावे.

      मुळनिवासी एकता संघर्ष समिती तालुका जिवतीच्या वतीने आदिवासी आरक्षणात धनगर वा इतर जातीचा समावेश करू नये, पेसा कायद्याची अंमलबजावणी करणे, कंत्राटी कर्मचारी भरतीचा निर्णय रद्द करणे,जिवती तालुका राखिव वनक्षेत्रातून वगळणे, जिल्हा परिषद व शास.आश्रम शाळांचे खाजगीकरण थांबवावे या सह विविध मागण्यासाठी आदिवासीचा जंगोम जन आक्रोश मोर्चा (५ आक्टोंबर) लक्ष वेधण्यासाठी स्थानिक क्रांतिविर बाबुराव शेडमाके चौकात रास्ता रोको आंदोलन केले.यामुळे चारही बाजूंनी जाणारी वाहतूक जवळपास २ तास ठप्प पडली होती.मा.तहसिलदार यांनी मोर्चाच्या ठिकाणीं निवेदन स्वीकारले.

      मोर्चाचे नेतृत्व ,आदिवासी समाजाचे जेष्ठ नेते भिमराव पाटील मडावी, युवा नेते गजानन गोदरु पाटील जुमनाके, भिमराव मेश्राम माजी सभापती, नामदेव जुमनाके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, माजी सभापती सुनिल मडावी,नगरसेवक शामराव गेडाम नगरसेवक क्रिष्णा सिडाम, मलकु पा, कोटनाके, बापूराव मडावी, सत्तरशाहजी कोटनाके, भोजी पा, आत्राम, बाजीराव पा, वल्का, महीपाल मडावी, धर्मा पा, पेन्दोर ,भिमराव पा, जुमनाके, अमृत आत्राम, मारु पा नैताम, सुकलाल कोटनाके, शंकर गेडाम सतलुबाई गोदरु पा, जुमनाके, अनिताताई धृर्वे, शुभांगी जुमनाके, आश्विनीताई कोरांगे, मुळ निवासी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा, लक्ष्मण मंगाम कोषाध्यक्ष, कंठु कोटनाके, सचिव सिताराम मडावी, व मुळ निवासी एकता संघर्ष चे केशव कुमरे, निलेश मेश्राम, विलास आत्राम व सर्व पदाधिकारी व तालुक्यातील समस्त आदिवासी समाज बांधव यांच्या उपस्थितीत मा, तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले या वेळी , तहसीलदार मा, अविनाशजी शेंबटवाड यांनी माहमाहिम राज्यपाल व शासनापर्यंत पोहचवण्यासाठी आश्वासन दिले, सदर जंगोम जन आक्रोश मोर्चाचे सूत्रसंचालन कंठु कोटनाके व लिंगोराव सोयाम सर यानी केले तर प्रास्ताविक मुळ निवासी एकता संघर्ष समितीचे सचिव सिताराम मडावी यांनी केले तर आभार मुळ निवासी एकता संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रा, लक्ष्मण मंगाम यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये