ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगरपंचायतचे सिटी कोऑर्डिनेटर आणि नोडल अधिकारी यांनी दोन वर्षापूर्वीची फोटो शासनाला केले सादर

अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेऊन ग्राम स्वच्छता पंधरवडा करायचा होता साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

नगरपंचायत समिती द्वारा स्वच्छता अभियान केंद्र शासनाचे आदेशान्वये किमान 15 दिवस प्रत्येक प्रभागात राबविणे आवश्यक होते.

सावली नगरपंचायत कार्यालयाचे प्रभारी मुख्याधिकारी हे अधिनस्त अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर विश्वास ठेवून कामे करीत असतात शासनाचा आदेश आहे की १५सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर पर्यंत स्वच्छता अभियान पाळणे गरजेचे आहे.या अभियानामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची मदत घेऊन ग्राम स्वच्छता पंधरवडा साजरा करायचा होता परंतु याबाबत सावली येथील नगरपंचायतचे सिटी कोऑर्डिनेटर आणि नोडल अधिकारी यांनी कोणताही उपक्रम न राबवताच दोन वर्षापूर्वीचे जुने फोटो अपलोड करून शासनाला माहिती सादर केली याबाबत संबंधित पदाधिकारी यांना अंधारात ठेऊन स्वच्छता अभियान राबविन्यात आला आहे त्यानुसार दोन वर्षा पूर्वीचे फोटो शासनाला सादर केले आहेत याबाबत शासनाचा आदेश होता की स्थानिक स्वराज्य संस्थेची मदत व नगर नगरपंचायतचे पदाधिकारी नगरसेवकांची मदत घ्यायची होती.

परंतु, त्यांनाही कोणती माहिती संबंधित अधिकारी कुमारी दुधबळे यांनी दिलेली नाही. मुख्यालयात राहत नसल्यामुळे त्यांचे अधिनिस्त कर्मचारी दोन वर्षांपूर्वीचे फोटो ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. असे दाखविले. परंतु, त्यांनी जे फोटो सादर केले त्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयचे विद्यार्थी यांचा फोटो आणि इतर फोटो टाकले ते सर्व खोटे आहेत याबाबत संबंधित अधिकारी यांना माहिती विचारली असता दुधबळे यांनी उडवा – उडविची उतरे दिली आणि तुम्हाला काय करायचे आहे ते करा याशिवाय माहिती घ्यायची असेल तर लेखी अर्ज करा असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये