ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नांदा येथील पुलाच्या मागणी करिता संघर्ष समितीची स्थापना

समितीच्या वतीने पालकमंत्री खासदार आमदार यांची केली जाणार मनोधरणी

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

      मागील वीस ते पंचवीस वर्षापासून नांदा गावाला लागून असलेल्या बारमाही वाहणाऱ्या नाल्यावरती पुलाच्या मागणीला घेऊन नांदा गावकरी शेतकरी व येथील तत्कालीन राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या सगळ्यांच्याच वतीने जमेल त्या मार्गाने नाल्यावरती पूल बांधून देण्यात यावे या मागणीला घेऊन विनवणी निवेदन तक्रारी अशा अनेक खटाटोपी करण्यात आल्या अनेकदा पूल मंजूर झाले मंजुरी करता तांत्रिक मान्यताही मिळाल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी नारळ फोडून श्री गणेशा सुद्धा केला मात्र पुलाच्या बांधकामाची सुरुवात अध्यापन पावेतो न झाल्याने कोरोना सदृश्य काळापासून प्रामुख्याने पावसाळ्याच्या दिवसात अनेक घटना दुर्घटना सदर नाल्यावरती घडल्या यासंबंधीच्या अनेक बातम्या दूरचित्रवाणी व वर्तमानपत्रात प्रसिद्ध सुद्धा झाल्या.

तरीसुद्धा तत्कालीन व विद्यमान शासनाला घाम फुटला नाही त्यामुळे गावातील शेतकरी बांधवांनी हनुमान मंदिरात एकत्र येऊन सदर समस्येची कारण मीमांसा करत नांदा पूल मागणी संघर्ष समितीची निष्पक्ष स्थापना केली या समितीमध्ये प्रतिष्ठित नागरिक अंकुश दाभेकर सुभाष खोके भास्कर गोंडे गहिनीनाथ वराटे उमेश भाऊ पोहाणे गोपाल गिरडकर रत्नाकर विरुतकर राहुल चटप किसन राऊत हरिदास गुंडे गुलाब पाटील इटनकर शंकर राऊत भाऊराव निब्रड गुलाब ईटणकर मिथुन राऊत सुरेश रावजी लोंढे नथू खोके विनोद राऊत व असंख्य शेतकरी बांधवांचा या समितीमध्ये समावेश असून गावच्या प्रथम नागरिक सरपंच मेघाताई पेंदोर श्यामसुंदर राऊत संजय मुसळे रत्नाकर चटप पुरुषोत्तम निब्रट यांचे सल्ल्यानुसार सदर समिती कार्य करणार असून प्रसिद्धीची जबाबदारी प्रमोद वाघाडे व गणेश लोंढे यांच्यावर देण्यात आली आता ही समिती पालकमंत्री खासदार आमदार यांना पुलाच्या मागणीचे साकडे घालणार असून लवकरात लवकर मागणीची पूर्तता कशी करता येईल याविषयीची रणनीती ठरवणार असून मागणीच्या पूर्तते करिता आता,

मात्र, शेतकरी बांधवांनी कंबर कसल्याचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मागणीकडे विद्यमान राजकीय पदाधिकारी व शासन कोणत्या दृष्टीने बघते याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये