ताज्या घडामोडी

शिक्षण सम्राट डॉ. अशोक जीवतोडे भाजपाच्या वाटेवर – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार पक्षात स्वागत

25 जुन रोजी होणार पक्षप्रवेश?

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यातील शिक्षण सम्राट, समाजसेवक तसेच राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असणारे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे लवकरच राष्ट्रवादीला धक्का देऊन भाजपात प्रवेश करणार असुन डॉ. अशोक जीवतोडे ह्यांनी स्वतः ह्या गोष्टीस दुजोरा दिला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात ओबीसी आंदोलन उभे करण्यात मोलाचा वाटा असणारे डॉ. जीवतोडे हे जननेते असुन केंद्रातील नरेंद्र मोदी व राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकाभिमुख विकासात्मक कार्याने प्रेरित होऊन त्यांनी भाजपा मधे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपा देखिल अनुकूल असुन त्यांचे व्यक्तिमत्त्व बघता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः 25 जुन रोजी चंद्रपूर येथे होणाऱ्या दौऱ्याच्या वेळी मोठ्या कार्यक्रमात त्यांचे पक्षात स्वागत करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. 25 जुन रोजी पक्षाने न्यु इंग्लिश हायस्कूलच्या पटांगणावर कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे कळले असुन डॉ. अशोक जीवतोडे तिथे पक्षप्रवेश करतात की त्यांच्या प्रवेशासाठी स्वतंत्र कार्यक्रमाचे आयोजन करून जनता महाविद्यालयाच्या पटांगणात पक्षप्रवेश होतो हे मात्र स्पष्ट झालेले नाही.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये