ताज्या घडामोडी

अक्षय भालेराव च्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा दया

वंचित बहुजन आघाडी नागभीड चे वतीने तहसीलदार नागभीड यांना निवेदन

चांदा ब्लास्ट :सुधाकर श्रीरामे

नांदेड जिल्ह्यातील बोढार हवेली येथील अक्षय भालेराव वंचित बहुजन आघाडी तालूका महासचिव याची गावातील गावागुंडाने जातीयतेच्या भावानेतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनी अक्षय भालेराव ची हत्या करण्यात आली. हे गाव नांदेड शहरापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर असताना गावात जातीय तेढ असल्याचे पोलीस विभागाला कल्पना होती यांनी आंबेडकर जयंती दिनी बंदोबस्त ठेवला नाही. हा पुरवनियोजित कट असून या कटात सहभागी असलेल्या सर्वांची सखोल चौकशी करून प्रकरण जलद गती न्यायालयात चालविन्यात यावे. यात सहभागी असलेल्या सर्वाना फाशीची शिक्षा देण्यात यावी या घटनेचा नागभीड वंचित बहुजन आघाडीचे वतीने निषेध करण्यात येत आहे. सदर घटनेची शासनाने त्वरित कार्यवाही करावी याकरिता नागभीड वंचित बहुजन आघाडीचे वतीने मा तहसीदार नागभीड यांना निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष खेमदेव गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष अस्विन मेश्राम, शहर अध्यक्ष माणिक दोहीतरे, डॉ प्रेमालाल मेश्राम, राजकुमार मेश्राम, सुखदेव प्रधान, धीरज अलोणे, मनोहर ओरके, धर्मवीर गरडकर, प्रकाश वाकडे, प्रभाकर कर मर कर यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये