गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बियर,विदेशी दारू व दोन मोपेडसह 2 लाख 2 हजारावर मुद्देमाल जप्त

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

          दिनांक 08/02/2024 रोजी स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील पथकाला गुप्त माहीती मिळाली की, गणेश नगर बोरगाव येथे राहणारा दर्शन फुंदे व त्याचा मित्र घनश्याम गिरडकर हे त्यांच्या ताब्यातील दोन मोपेड गाडीने उदय बार विटाळा जिल्हा अमरावती येथून देशी-विदेशी दारू घेऊन दर्शन फुंडे यांच्या घरी येत आहे अशा माहितीवरून त्याच्यावर नाकेबंदी करून दारूबंदी प्रो. रेड केला असता आरोपी नामे दर्शन हरिभाऊ फुंडे वय 23 वर्ष रा. गणेश नगर बोरगाव मेघे वर्धा व घनश्याम संजय गिरडकर वय 22 वर्ष रा. कारला रोड वैष्णवी कॉम्प्लेक्स जवळ वर्धा यांच्या ताब्यातून विदेशी दारू बियरसह, दोन मोपेड गाडी असा एकूण 2,02,350/- रुपये चा माल जप्त करून आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

            सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधिक्षक डाॅ. सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, सलाम कुरेशी पोलीस अंमलदार सचिन इंगोले, राजेश तिवसकर, रामकिसन ईप्पर, अरविंद इंगोले सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये