ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुबिली फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे करण्यात आले वृक्षारोपण

चांदा ब्लास्ट

जुबिली फाउंडेशन, चंद्रपूर तर्फे 07 जुलै 2024 रोजी स्थानिक अष्टभुजा वार्डातील नाना- नानी पार्कमध्ये सामाजिक बांधिलकी जोपासत 520 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले.

याप्रसंगी चंद्रपूर शहर वनविभागाचे वनरक्षक श्री कोडापे सर ,जुबिली फाउंडेशनचे अध्यक्ष श्री अतुल मेश्राम, सचिव संतोष तेलंग, सहसचिव अमूल रामटेके, कोषाध्यक्ष कात्यायन शेंडे, विश्वस्त प्रीती खोब्रागडे, रेवती बडकेलवार,आरती श्रावणे,दिगंबर चौधरी, रंजना नागुलवार आणि सदस्यांसमवेत तीस माजी विद्यार्थ्यांची उपस्थित होती.

कार्यक्रमाप्रसंगी श्री.कोडापे सरांचे अतुल मेश्राम यांनी पुष्पगुच्छ देउन स्वागत केले.तर त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कात्यायन् शेंडे यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. संतोष तेलंग यांनी जुबिली फाउंडेशन द्वारा घेतलेल्या तसेच घेण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत थोडक्यात माहिती दिली.

‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’या तुकाराम महाराजांच्या ओळीला समर्पक होऊन, जुबिली फाउंडेशन संस्था व त्यांच्या कुटुंबासमवेत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या अशा विविध उपक्रमांमध्ये ही संस्था नेहमीच अग्रेसर असते. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यास चंद्रपूर वन विभागाचे विभागीय अधिकारी( डी.एफ.ओ )श्री. खाडे सर यांचे विशेष सहकार्य लाभले हे येथे उल्लेखनीय.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये