ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा स्तरीय तायकांदो क्रिडास्पर्धांमध्ये स्किल डेव्हलपमेंट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

जिल्हास्तरीय तायकांदो या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी देऊळगाव राजा च्या विद्यार्थ्यांची शालेय विभागीय तायकांदो स्पर्धेसाठी निवड

        क्रिडा युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार्‍या २०२४-२५ च्या जिल्हास्तरीय शालेय क्रिडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या असून जिल्हास्तरीय तायकांदो या स्पर्धांमध्ये देउळगाव राजा येथील स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी देउळगाव राजा प्रशिक्षक राजेश खांडेभराड याच्या मार्गदर्शनात विद्यार्थी आर्यन पवार 14 वर्ष वयोगटात तर बालाजी नवले 17 वर्ष वयोगटात उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यानी प्रथम क्रमांक मिळवून होत असलेल्या विभागीयस्तर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

तर नीलकंठ वारुळे,निलेश शिवरकर,अरूष शिवरकर,  यांना दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले आहे यासर्व विद्यार्थी आणि प्रशिक्षक याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये