ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कार्तिक रविंद्र काळबांडे ने NIFT मुंबई मध्ये मिळविला प्रवेश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी तसेच जि. प. (माजी शास.) जुबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूरचे माजी प्राचार्य श्री रविंद्र काळबांडे यांचे पुत्र कार्तिक काळबांडे हा सन 2023 मध्ये झालेल्या National Institute Of Fashion Technology (NIFT) ह्या अखिल भारतीय स्तराच्या परीक्षेत ई. मा. व. या वर्गवारीतून 31 व्या तर सर्वसाधारण वर्गवारीतून 166 व्या गुणानुक्रमाने उत्तीर्ण होऊन त्याने Bachelor of Design (B. Des.) या चार वर्षाच्या पदवी परिक्षेच्या Fashion Communication (F.C.) या अभ्यासक्रमासाठी NIFT कॉलेज मुंबई येथे प्रवेश घेतलेला आहे.

त्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रम्हपुरीचे प्राचार्य श्री देवेशजी कांबळे यांनी अभिनंदन करून त्याच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये