ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद (माजी शास.) हायस्कूल ब्रम्हपुरीला PODIUM (डायस) भेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी : सीताबाई पांडुरंग काळबांडे यांचे स्मृती प्रित्यर्थ दि. 05 सप्टेंबर 2023 ला श्री रविंद्र काळबांडे माजी प्राचार्य जि. प. (माजी शास.) जुबिली हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर यांचेवतीने जिल्हा परिषद (माजी शास.) हायस्कूल ब्रम्हपुरीला नेहमी होणाऱ्या शालेय कार्यक्रमाला आवश्यक असणारा PODIUM (डायस) सप्रेम भेट देण्यात आला.

त्यानिमित्ताने श्री पवनकुमार रामटेके, मुख्याध्यापक जिल्हा परिषद (माजी शास.) हायस्कूल ब्रम्हपुरी यांनी शाळेला सप्रेम भेट देऊन जिल्हा परिषद शाळांबद्दल आस्था बाळगल्याबद्दल श्री रविंद्र काळबांडे सरांचे मनापासून आभार व्यक्त केले. श्री रविंद्र काळबांडे सरांनी याच शाळेत सन 2001 ते 2015 या 14 वर्षाचे काळात सहाय्यक शिक्षक (उच्च श्रेणी) या पदावर कार्य केलेलं आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये