ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोहिंग्या व बांग्लादेशींचा ओबीसी आरक्षणातील घुसखोरीचा पर्दाफाश करणारे हंसराज अहीर यांचा ओबीसी संघटनाव्दारे सत्कार

जिल्हा ऑटो चालक-मालक संघटना व अन्य ओबीसी सामाजिक संघटनांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून हार्दिक सत्कार

चांदा ब्लास्ट

देशातील ओबीसी बांधवांच्या न्याय अधिकारासाठी सातत्याने संघर्षरत असणारे नेतृत्व तसेच ओबीसींच्या आरक्षण हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींना यापासून परावृत्त करण्यास धडपडणारे व्यक्तीमत्व पश्चिम बंगाल मधील रोहींग्या व बांग्लादेशी घुसखोरांमुळे देशातील ओबीसी हिंदु तसेच मुस्लिम बांधवांच्या आरक्षण अधिकारावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारे राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांचा चंद्रपूर महानगर ओबीसी मोर्चा, चंद्रपूर जिल्हा ऑटो चालक-मालक संघटना व अन्य ओबीसी सामाजिक संघटनांच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून हार्दिक सत्कार करण्यात आला.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्येष्ठ भाजपा नेते विजय राऊत, चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे विस्तारक खुशाल बोंडे, संजय गजपुरे, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनूले, सुभाष कासनगोट्टुवार, चंद्रपूर महानगर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष विनोद शेरकी, ऑटो चालक-मालक संघटनेचे राजेंद्र खांडेकर, गुरुदेव सेवा मंडळाचे डॉ. अंकुश आगलावे, मोहन चौधरी व अन्य मान्यवर पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी देवराव भोंगळे, खुशाल बोंडे, विनोद शेरकी प्रभृतींनी हंसराज अहीर यांनी ओबीसी बांधवांच्या सामाजिक हितरक्षणासाठी दिलेल्या महत्वपुर्ण योगदानाबद्दल प्रशंसा करुन त्यांच्या कृतिशील नेतृत्वामध्ये ओबीसी बांधवांना संवैधानिक अधिकार मिळत असल्याचे आपल्या मनोगतातून सांगितले. पश्चिम बंगालमधील राज्य सरकारच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे मुळ ओबीसी बांधवांवर, त्यांच्या आरक्षण अधिकारावर रोहींग्या व अन्य घुसखोरांव्दारे होत असलेल्या आक्रमण व अन्यायाचा पहिल्यांदाच पर्दाफाश करीत संपुर्ण देशाचे लक्ष वेधण्याचे महान कार्य केल्याबद्दल तसेच बिहार राज्यात ओबीसी आरक्षण नियमांचे होत असलेले उल्लंघन, पंजाब सरकारव्दारा ओबीसी आरक्षणांबाबत होत असलेली निष्क्रीयता व राजस्थान सरकारव्दारा ओबीसी आरक्षणाबाबतच्या अनास्थेवर कडक प्रहार केल्याबद्दल ओबीसी मोर्चा व अन्य ओबीसी संघटनांनी त्यांचे विशेष आभार मानुन कृतज्ञता व्यक्त केली.

या कार्यक्रमास संजय तिवारी, दिवाकर पुद्दटवार, शशिकांत म्हस्के, प्रदीप किरमे, शैलेश इंगोले, मधुकर राऊत, राम हरणे, भाऊराव उताणे, विठ्ठल डुकरे, सचिन कोतपल्लीवार, रवि लोणकर, सचिन संदुरकर, सुभाष अदमाने, सुदामा यादव, संजय मिसलवार, रवि चहारे, गणेश रामगुंडावार, सुभाष ढवस, शरद बोरकर, श्याम बोबडे, राहुल सुर्यवंशी, अॅड. सारिका संदुरकर, वंदना संतोषवार, मुग्धा खांडे, गीता महाकुलकर, अरुणा चौधरी, रेणुका घोडेस्वार, मनिषा महातव, सौ. वासमवार, सिंधु राजगूरे यांच्यासह ओबीसी मोर्चा व अन्य संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये