गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी मेघे पोलिसांकडून मांडवा जंगल शिवारात वॉश आउट मोहीम

एकूण 45 हजारावर मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे की, नमुद घटना ता. २८/७/२३ चे १७.३९ वा. वेळी मुखबिरचे खात्रीशीर खबरेवरून पंच व पो. स्टॉपचे मदतीने यातील आरोपीतांवर प्रो. रेड केला असता मौजा मांडवा शेत शिवारात गावठी मोहा दारूची भट्टी लावुन गावठी दारू गाळीत असतांना दुरून दिसले आरोपी 2) दिलीप भलावी (पसार) दोन्हा रा मांडवा ता.जि. वर्धायास पोलीसची चाहुल लागताच तो मोक्यावरून पसार झाला. मोक्यावर आरोपी १) किसना रामसा कुंभेकार वय 62 वर्ष याचे ताब्यातुन 1) एका लोखंडी काळ्या बुडाचे ड्राममध्ये 50 लीटर उकडता मोहा रसायन सडवा प्रती लिटर 100/-रू प्रमाणे 5,000 /- रू 2) एकुन 4 लोखंडी ड्रम मधे प्रत्येकी 90 लीटर प्रमाणे 400 लीटर मोहा रसायन सडवा प्रती लिटर 100 रु. प्रमाणे कि. 36,000/- रु. 3) 5 लोखंडी ड्रम प्रती ड्रम 500 रु. प्रमाणे 2500 रु. 4) एका प्लास्टीक डबकी मधे 10 लीटर गावठी मोहा दारू प्रती लीटर 100/- रू प्रमाणे 1000/- रू. प्लास्टीक डबकी की. 200/- रू असा 1,200 /- रू5) एक जर्मन घमेले, रबरी नडी, जळाऊ लाकुड, पोतेले, नेवार पट्टी की. 1,000/- रू. असा एकुन जुमला किंमत 45,700/- रु. चा माल मिळुन आल्याने मौका जप्ती पंचनाम्या प्रमाणे माल जप्त करून सी.ए. सॅम्पल सील करून आरोपी १) किसना रामसा कुंभेकार वय 62 वर्ष 2) दिलीप भलावी (पसार) दोन्हा रा मांडवा ता.जि. वर्धा विरूध्द गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

करिता सदरचा अहवाल माहितीस्तव सविनय सादर आहे.
*कारवाई -* सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. नूरूल हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन सावंगी चे पो.नी. मा. श्री. धनाजी जळक यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोना भुषन निघोट नं 1317, अनिल वैद्य 1399 यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये