ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर येथील युवकाचा अमलनाला धरणात बुडून मृत्यू

अकस्मात मृत्यूची नोंद ; पुढील तपास सुरू

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

येथून जवळच असलेल्या अमलनाला धरणाच्या वेस्ट वेअर मध्ये चंद्रपूर येथील युवकाचा बुडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना 15 ऑगस्टला दुपारी दोन वाजेच्या दरम्यान घडली.

अमलनाला धरण तुडुंब भरले असून वेस्ट वेअर अद्याप सुरु झाला नाही तरी पण येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत आहेत,15 ऑगस्ट ला ला शुभम शंकरराव चिंचोलकर (32) रा.दाताळा,चंद्रपूर हा युवक आपल्या मित्रांना सोबत घेऊन अमलनाला धरण च्या वेस्ट वेअर जवळ फिरण्यासाठी आला होता, शुभम ला पोहता येत नसताना सुद्धा वेस्ट वेअर वरून खोल पाण्यात उडी मारली, पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह तलावाबाहेर काढून पंचनामा केला.अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत.

पर्यटकांनी अमलनाला धरणात पोहण्याचा प्रयत्न करू नये, खोल पाण्यात उतरु नये असे आवाहन पोलीस प्रशासन व पाटबंधारे विभागाने केले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये