ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सनराईज योगा बेनिफिट वूमन ग्रुप तर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्र गीत कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सनराईज योगा बेनिफिट वूमन ग्रुप,गडचांदूर तर्फे 15 आगस्ट 2023 ला स्वातंत्र्य दिनानिमित्त राष्ट्र गीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सकाळीच स्वातंत्र्य दिनानिमित्त बहुसंख्य महिलांनी नियमित योगा कार्यक्रम पार पडल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले महिलांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व सांगून सर्व महिलांनी सामूहिक राष्ट्र गीत सादर केले यापूर्वी सुध्दा या ग्रुप तर्फे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाचे मुख्य संयोजिका कुंतल चव्हाण यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले यावेळी अल्का बोधाने, कल्पना बंदूरकर,गेना राठोड, वंदना धांडे, सुधा हेपट, नभा बुरान,वंदना मडावी,प्रांजली आवारी,मंगला तुरारे, अर्चना घोटकर,प्रतीक्षा मंदे, लीना लांजेकर, कृष्णा ठाकरे,सरोज मडावी,सुमित्रा गायकवाड आदींनी सहकार्य केले यावेळी मोठया संख्येनी महिला उपस्थित होत्या

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये