ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथील तालुका क्रीडा संकुलनात सोयी सुविधा निर्माण करा

चांदा ब्लास्ट  प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपना – कोरपना या तालुकास्तरावरील तालुका क्रीडा संकुल येथे अनेक सोयी सुविधा ची उणीव आहे. त्यामुळे खेळाडूंची गैरसोय होत आहे. या दृष्टीने क्रीडा संकुलनाचा पायाभूत विकास करण्यात यावा या मागणीचे निवेदन राज्याचे वन व सांस्कृतिक तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सामाजिक कार्यकर्ते पवन सदाशिव बुरेवार व क्रीडा प्रेमींनी दिले. कोरपना येथे तालुका क्रीडा संकुल आहे. मात्र येथे पिण्याच्या पाण्याची, मुला मुलींना स्वतंत्र स्वच्छतागृह, मैदानावर विद्युत व्यवस्था नाही. तसेच क्रीडांगणातील खेळाची मैदानी धावपट्टी, पादचारी मार्ग, तिन्ही बाजूला संरक्षण भिंत आदी कामे अपूर्ण अवस्थेत आहे. क्रीडा भवनाची दुर्लक्षितपणामुळे दुरावस्था झाली आहे. त्यामुळे क्रीडा संकुल अडगळीत पडले आहे. या क्रीडा संकुलात मोठ्या संख्येने खेळाडू नियमित सराव व व्यायामासाठी येतात.

त्यांना या गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. करिता येथे सोई सुविधा निर्माण होणे अत्यंत गरजेचे आहे. असे निवेदनाच्या माध्यमातून सांगण्यात आले. तसेच या संबंधाने पाठपुरावा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी बूरेवार यांचे सह खेळाडू उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये