ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपुरात विदर्भस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे यशस्वी आयोजन

विदर्भातील २०० स्केटर सहभागी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्र दिनानिमित्त चंद्रपुरात 1मे ला विदर्भस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया येथील एकूण 200 स्केटर सहभागी झाले होते. या स्पर्धेत विदर्भातील विविध जिल्ह्यातील स्केटर्सनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले.

चंद्रपूरच्या जिल्हा क्रीडा स्टेडियमवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रमुखअतिथी म्हणून श्री.सुभाष भाऊ कासमगोट्टूवार, मनोज पाल, श्री. अविनाश पुदान, श्री. कुदन नायडू, सागर हरणे, श्री. रामटेक सर, नगराळे सर,थेरे सर, कुळमेथे सर, रवींद्र मिसाळ सर,विलास देशपांडे यांनी सर्व विजेत्या स्केटर्सचे अभिनंदन केले.आयोजक आतिश नामदेवराव धुवई (मायकेल सर)होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये