ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

साहित्याच्या माध्यमातून हिंदी भाषेची सुंदरता समाजा पर्यंत पोहचवा – आ. किशोर जोरगेवार

कनिष्ठ महाविद्यालय हिंदी अध्यापक संघाच्या वतीने ‘उडान’ हिंदी दिवस समारोह कार्यक्रमाचे आयोजन

चांदा ब्लास्ट

हिंदी आपली राष्ट्र भाषा आहे. या भाषेचा मोठा इतिहास राहला आहे. त्यामुळे या भाषेचे जतन करत या भाषेतील साहित्य जपून या साहित्याच्या माध्यमातून हिंदी भाषेची संदुरता समाजा पर्यंत पोहचवा असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

   रेंजर कॉलेज येथे हिंदी अध्यापक संघाच्या वतीने ‘उडान’ हिंदी दिवस समारोह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत. या कार्यक्रमाला चंद्रपूर हिंदी अध्यापक संघाचे राज्य अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, माध्यमीक शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, ज्येष्ठ हिंदी साहित्यिक डॉ. बानो सरताज काजी, अनिल शिवणकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

  यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, हिंदी अध्यापक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात विदर्भातून आलेल्या अध्यापक आणि हिंदी साहित्यिक यांच्यावर हिंदी भाषेचे महत्व प्रत्येक घटका पर्यंत पोहचविण्याची मोठी जबाबदारी आहे. हिंदी ही राज्य भाषा असली तरी ग्रामिण भागात हिंदी भाषेचा हवा तसा वापर केल्या जात नाही. त्यामुळे अशा आयोजनातून यावर चिंतन मंथन करण्याचे काम झाले पाहिजे. अद्यापकांच्या आणि साहित्यिकांच्या माध्यमातून हे काम होणे अपेक्षित असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

   हिंदी दिवसा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करत असतांना या भाषेतील साहित्यांवरही आपण प्रकाश टाकला पाहिजे. असे आयोजन गरजचे असून ते नियमित झाले पाहिजे, यात लोकप्रतिनीधी म्हणून शक्य ती सर्व मदत करण्याची आपली तयारी असल्याचे यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

या कार्यक्रमात सेवा निवृत्त शिक्षिका वैशाली मद्दीवार यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आमदार किशोर जोरगेवार यांच्या संघर्षमय जिवनावर प्रकाश टाकला त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यापक संघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी, वर्धा जिल्हा कार्यकारणी आणि गोंदिया जिल्हा कार्यकारणीच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये