ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तहसिल कार्यालयावर मराठा समाजाचा निषेध मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता.अंबड) येथील मराठा समजाच्या आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा घटनेचा निषेध करण्यासाठी जिवती तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने शहरात सोमवारी (ता.११) निषेध मोर्चा काढण्यात आला.

यावेळी शहरातील व्यापारी व व्यावसायीकांकडून स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंदही पाळण्यात आला. सोमवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या निषेध मोर्चामध्ये मराठा समाजाला पाठींबा देण्यासाठी मुस्लिम आणि इतर जाती-धर्माचे नागरिकही सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चास सुरुवात करण्यात आली. मराठा समाजाच्या महिलाही मोठ्या प्रमाणात मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून, वीर बाबुराव शेडमाके चौक मार्गे निषेध मोर्चा काढून तहसील कार्यालय येथे मोर्चाचा शेवट करण्यात आला. मराठा आंदोलकांवर केलेल्या हल्याचा निषेध करून यापुढे अशा प्रकारचे हल्ले खपवून घेणार नसल्याचे मोर्चात सहभागी झालेल्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाजाचे बांधव व विविध समाजाचे बांधव सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये