ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरपालिकेचा स्थापना दिन उत्साहात साजरा : झेंडीमुक्त शहर अभियान सुरु

मनपाच्या विविध सेवांचा शुभारंभ ; ३९२० विद्यार्थ्यांची होणार रक्तगट तपासणी व सिकलसेल चाचणी

चांदा ब्लास्ट

दि. २५ ऑक्टोबर २०११ रोजी चंद्रपूर महानगरपालिकेची स्थापना झाल्यापासुन विविध लोकोपयोगी कामे व अनेक विकासकामे करण्यात आलेली आहेत. विकासकामांची ही मालिका पुढेही सुरु राहणार असुन प्रशासन अधिक लोकाभिमुख व गतिमान करण्यास कटिबद्ध असल्याची ग्वाही आयुक्त विपीन पालीवाल यांनी मनपा स्थापना दिन सोहळ्यात दिली.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या स्थापना दिनानिमित्त सकाळी ८ वाजता नमो शहर सौंदर्यीकरण अभियान अंतर्गत संस्कार स्वच्छतेचा मंत्र आरोग्याचा या अभियानाची सुरवात राजीव गांधी उद्यान पठाणपुरा येथुन करण्यात आली. पठाणपुरा परिसरातील एक झेंडी (अनधिकृत कचरा टाकण्याचे ठिकाण) पुर्णपणे बंद करण्यात आली. सदर झेंडीमुक्त अभियान यापुढेही राबविण्यात येणार असुन संपूर्ण शहर झेंडीमुक्त करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात उपस्थीत नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.

सकाळी ९ वाजता गजानन महाराज उद्यान,वडगाव येथील मोकळ्या जागेत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमांतर्गत १५० विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. याप्रसंगी माजी नगरसेविका सुनीता लोढीया,माजी नगरसेवक देवानंद वाढई तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.      
मनपा सभागृहात १२ वाजता संपन्न झालेल्या कार्यक्रमात मनपाच्या विविध सेवांचा शुभारंभ करण्यात आला. सहज वापरण्याजोगी मनपाची नवीन वेबसाईटऑल इन वन ॲप  तसेच चंद्रपूर सिटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन नावाचे व्हॉट्स ॲप चॅनेलसुद्धा सुरु करण्यात आले. व्हॉट्स ॲप चॅनेलद्वारे आता नागरिकांना मनपाच्या बातम्या,योजनाउपक्रम यांची माहीती मिळणार आहे. तसेच संस्कार स्वच्छतेचा मंत्र आरोग्याचा या अभियानाच्या लोगोचे उदघाटन करण्यात आले.  
मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोफत रक्तगट तपासणी व सिकलसेल चाचणी शिबीर आयोजीत करण्याच्या अभियानाची सुरवातही स्थापना दिवशी करण्यात आली.या प्रसंगी काही विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली. येत्या काही दिवसात मनपाच्या २७ शाळांच्या ३९२० विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी व सिकलसेल चाचणी करण्यात येणार आहे. याप्रसंगी २०११ ते २०२३ या कालावधीत केलेल्या विकासकामांची चित्रफीतही उपस्थितांना दाखविण्यात आली.

स्थापना दिवशी आयुक्त विपीन पालीवाल,उपायुक्त अशोक गराटे,उपायुक्त मंगेश खवले,शहर अभियंता अनिल घुमडे,सहायक संचालक नगररचना सुनील दहीकरलेखापरीक्षक मनोज गोस्वामी,सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे,सचिन माकोडे,राहुल पंचबुद्धेउपअभियंता वीजय बोरीकर,रवींद्र हजारे,डॉ. वनिता गर्गेलवार,रवींद्र कळंबे,डॉ.अमोल शेळके,नागेश नीत व मोठ्या संख्येने विद्यार्थी,अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये