ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीतील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात

हातगाडी, व्यावसायिकांनी रस्ता गिळंकृत केल्याने वाहतुकीस अडथळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- शहरातील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालया पासून ते पोलीस स्टेशन पर्यंतच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूने अनधिकृतरित्या हातगाडी व स्थानिक व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात आल्याने येथील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परंतु नगर पंचायतचे अतिक्रमण विभाग मूग गिळून गप्प असल्याने वाहनचालक व नागरिकांना प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या मुख्य रस्तावर बेकायदेशीर हातगाडीवाले, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते तसेच अनेक दुकानदारांचे साहित्य तसेच पानठेले, अनेक छोटी-मोठी दुकाने,आदी व्यावसायिकांनी रस्त्याच्या आत मध्ये अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या वाहनचालकांना प्रवास करताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्‌भवत आहे. तसेच लहान मोठे अपघात घडत आहेत. परंतु नगर पंचायत प्रशासन याकडे डोळेझाक करत असल्याने रस्ता मोठा होऊनही हीच स्थिती येथे पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे नगर प्रशासन व क्षेत्रीय कार्यालय यांनी येथील अतिक्रमण हटवून, येथील रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

रस्त्यातच केली जातात वाहने पार्क

स्थानिक व्यावसायिकांनी आपल्याकडे येणाऱ्या ग्राहकांसाठी वाहने पार्क करण्यासाठी जागाच ठेवली नाही. उलट आपली दुकाने रस्त्यालगत असलेल्या नालीवर थाटली आहेत, व ग्राहक रस्त्यातच वाहने पार्क करून खरेदीसाठी जात आहेत. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. परंतु याकडे वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने बेशिस्तपणे पार्किंग करणारांचे चांगलेच फावत आहे. नगर पंचायत अतिक्रमण विरोध पथक हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका निभावत असल्याने यांच्यावर कोणाचेही नियंत्रण राहिले नाही. त्यामुळे रस्ता अरुंद होत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये