ताज्या घडामोडी

मातीत दबून युवकाचा संशयास्पद मृत्यू

माझ्या मुलाचा खुन झाला,मृतकाच्या वडिलांची पोलिसात तक्रार

चांदा ब्लास्ट – नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :-तालुक्यातील सोनेगाव येथे गुरुवार रोजी रात्रौ तीनच्या सुमारास माती उत्खनणं कामावर असतांना सौरभ ईश्वर दर्वे वय 23 वर्ष हा युवक
ठार झाला. मृतकाच्या वडीलाने माझ्या मुलाचा मृत्यू अपघात नसून त्याचा घातपात झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे दिल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे.

ब्रम्हपुरी शहरापासून आठ दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सोनेगाव येथे माती व रेतीचे अवैध उत्खनणं रात्रौच्या सुमारास मोठ्या प्रमाणात सुरु असते मृतक युवक सुद्धा ट्रॅक्टरने माती भरण्याच्या कामावर मजूर म्हणून काम करीत होता. त्याचा काही दिवसापूर्वी कामावरील सोबती व मालक लोकांशी भांडण झालेला होता मात्र परिस्थिती अत्यंत गरीब असल्याने नाईलाजास्तव युवक कामावर जात राहिला पण बुधवार रात्रौ कामावर गेलेला मुलगा परतलाच नाही व गावातील लोकांनी तुमच्या मुलाचा शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टम आहे अशी माहिती सकाळी वडिलांना दिली.वडिलांने इतरत्र माहिती घेतली असता मुलगा सौरभ रात्रौ तीन वाजता दरम्यान मातीत दबून मरण पावला व जेसीबी च्या साहाय्याने मृतदेह काढून शासकीय रुग्णालयात दाखल केला अशी माहिती वडिलांना मिळाली

माती उत्खनणं करणाऱ्या मालकाने व त्याच्या सहकाऱ्यांनी मृतकाच्या कुटुंबीयाला कुठलीही सूचना न देता परस्पर मृतदेह शासकीय रुग्णालय ब्रम्हपुरी येथे दाखल करून आपली जबाबदारी टाळली तसेच मृतकासोबत अगोदर असलेल्या वादाने माझ्या मुलाचा मृत्यू अपघाती नसून त्याचा घातपात झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनं ब्रम्हपुरी येथे वडिलांनी दाखल केली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये