ताज्या घडामोडी

मोकाट जनावरांना लावणार रिफ्लेंक्टव्ह बेल्ट उपक्रमाची विभागीय आयुक्तांनी जाणून घेतली माहिती

रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी अभिनव उपक्रम प्राण्यांना जियोटॅगींगयुक्त बेल्ट लावणारा पहिला उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

मानवी चुकांमुळे रस्त्यावरील अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी होते. रस्त्यावर जनावरांना धडक लागून अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे पर्यायाने अपघातात वाहन चालकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने ॲप विकसित करुन ॲपच्या आधारे जियो टॅगींग करून महामार्ग परिसरातील गावात जनावरांना कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोहम्मद समीर मोहम्मद याकुब वर्धा यांच्याकडून जाणून घेतली.

यावेळी विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्यकार्यकारी अधिकारी रोहन घुगे पोलिस अधीक्षक नुरुल हसन सहाय्यक पोलीस अधीक्षक वृष्टी जैन यांनी जिल्हात या उपक्रमामुळे वाहन चालक आणि स्वतः प्राणी दोघांचेही रक्षण होईल प्राण्यांना रिफ्लेंक्टव्ह बेल्टने सुसज्ज करुन विशेषतः कमी प्रकाशाच्या परिस्थिती किंवा प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

असे विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी सांगितले जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून परिवहन विभागामार्फत महामार्गा वरील गाव परिसरातील जनावरांना पाच हजार पाचशे बेल्ट रिफ्लेंक्टव्ह लावण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे केवळ दृश्यमानता वाढविण्यासाठी नाही तर त्यांच्या भागात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अंमलबजावणी पारदर्शकता आणि परिणामकारकता देखील आहे प्रत्येक प्राण्याला जियो टॅगींग केले जाईल आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी आणि उपक्रमाच्या प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी ॲपद्वारे सर्वसमावेशक फोटो घेतले जात आहे.

गुरांचे रस्त्यावर येणे थांबविणे शक्य नसले तरी रिफ्लेंक्टव्ह बेल्ट लावून त्यांच्यामुळे होणारे अपघात टाळता येणार आहेत नागरिकांनी शहरातील भागात मोठ्या प्रमाणात मोकाट कुत्रे तसेच गुरे दिसल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये