ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुन्या वादाचे कारणावरुन हत्या करणाऱ्यास कलम ३०२ भादवि मध्ये आजीवन कारावास

तसेच १५ हजार रु.दंडाची ठोठावण्यात आली शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

कोर्ट विदयमान मा. श्री. एन. बी. शिंदे सो. जिल्हा व सत्र न्यायाधिश 1 वर्धा यांनी रमेश साहेबराव डेबुरकर वय 34 वर्ष रा. कोल्हापुर राव ता. देवळी जि. वर्धा यास 1) कलम 302 भादवि मध्ये आजीवन कारावास व 10,000/-रु. दंड न भरल्यास 01 वर्ष सश्रम कारावास 2) कलम 324 भादवि मध्ये 03 वर्ष सश्रम कारावास व 5,000-/ रु. दंड न भरल्यास 06 महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठाविण्यात आली.

हकीकत याप्रमाणे आहे कि, नमुद घ. ता. वेळी व स्थळी यातील आरोपी याने जुन्या वादावरुन फिर्यादी हिचा पती मृतक हा घरासमोर बसुन असताना आरोपी याने हातात जाड बाबुची काठी घेवुन येवुन त्यांचे डोक्यावर व तोंडावर वार करुन जखमी केल्याने फिर्यादी हि पतीस वाचविण्यास गेली असता तिलासुध्दा पाठीवर त्याच काठीने झोडपा मारला अश्या फिर्यादीचे तोडी रिपोर्ट वरुन पो.स्टे. देवळी यांनी गुन्हा क्र.661/19 कलम 302,324 भादवि नोंद करुन तपासात घेवुन सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. विद्यमान न्यायालयाने आरोपी विरुध्द दोषारोप निश्चीत करुन प्रकरण पुराव्या करीता निश्चीत केले. त्या प्रकरणी पैरवी देवळी यांनी मुद्देमाल न्यायालयात जमा केला व रासायनीक विश्लेषनाचे अहवाल प्राप्त करुन न्यायालयात सादर केला. याप्रकरणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, घटनास्थळ पंच, शेजारी साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, सी.ए.माल पोहचविणारे व तपासी अधिकारी यांना पैरवी अधिकारी यांनी वेळोवेळी हजर ठेवण्याची तसदी घेतली. तसेच परिस्थीती जन्य पुराव्याचे आधारे सदर प्रकरणी सिध्दपराधा पर्यंत नेण्यास अभियोजन पक्षा व पोलीस विभागाची भुमीका मा. न्यायाधिश मोहदयांनी ग्राह्य धरली.

सदर प्रकरणाचा तपास पोउपनि / मल्हारी ताळीकोटे यांनी केला व आरोपीने गुन्हा केल्याचा साक्षीदाराचे साक्ष मध्ये सबळ पुरावा उपलब्ध झाल्यामुळे आरोपीस 1) कलम 302 भादवि मध्ये आजीवन कारावास व 10,000/-रु. दंड न भरल्यास 01 वर्ष सश्रम कारावास 2) कलम 324 भादवि मध्ये 03 वर्ष सश्रम कारावास व 5,000-/ रु. दंड न भरल्यास 06 महीने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली. अशी शिक्षा ठोठाविण्यात आली.

सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीमती आर.आर. घाटे मॅडम यांनी परीश्रम घेवुन सचोटीने कामकाज हाताळले या प्रकरणात एकुण 14 साक्षीदार तपासण्यात आले असुन त्यांनी यशस्वी युक्तीवाद केला. त्यांना पैरवी अधिकारी मपोहवा / 1343 भारती कारंडे व पोहवा /1261 समीर कडवे यांनी साक्षदारांना मा. न्यायालयात हजर करून मोलाची कामगीरी बजावली. शासनातर्फे साक्षीदार तपासले. कोर्ट विदयमान मा. श्री. एन.बी. शिंदे सो. जिल्हा व सत्र न्यायाधिश 1, वर्धा यांनी आरोपीस दिनांक 28/12/2023 रोजी वरील प्रमाणे शिक्षा सुनावली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये