ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्पसंख्याक विकास मंचाव्दारे आयोजीत दोन दिवसीय मुस्लीम समाजाचा वधु-वर परिचय मेळावा संपन्न

चांदा ब्लास्ट

स्थानिक कोहीनुर मैदान, दादमहल वार्ड चंद्रपुर येथे अल्पसंख्याक विकास मंचाव्दारे दिनांक ०२ व ०३ मार्च रोजी प्रथमच मुस्लीम समाजातील युवक युवतीनां आपला जोडीदार निवडणे सोईस्कर व्हावे या हेतुने दोन दिवसीय उपवर उपवधु परिचय सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले

होते. या परिचय मेळाव्या प्रसंगी ०२ मार्चला सकाळी इमाम अक्तर रजा, अक्सा मस्जीद याचा तकरीरचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर या मेळाव्याचे उद्घाटन हॉजी अनिसजी अहमद, माजी पालकमंत्री, चंद्रपुर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी हुसेन मुकादम साहेब, मुंबई, मतीनजी शेख अध्यक्ष अल्पसंख्याक विकास मंच, चंद्रपुर हे उपस्थित होते या प्रसंगी उद्द्घाटनपर बोलतांना हॉजी अनिस अहमद साहेबांनी मुस्लीम समाजातील अश्या प्रकारच्या उपक्रमाचे कौतुक केले व असे कार्यक्रम ही समाजाची काळाची गरज असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी केले, तर हुसेन मुकाद साहेब यांनी समाजाला विकसीत करायचे असेल तर शिक्षणासोबतच अश्या सम्मेलनाचे तसेच वधु-वर परिचय सम्मेलनाची आवश्यकता उपस्थितासंमोर मांडली. वधु-वर परिचय सम्मेलनामुळे नातेसंबध जोडण्यास निश्चितच मदत होते.

यामुळे वधु-वर पक्षाचा मानसीक तथा आर्थीक त्रास कमी होत असल्याचे प्रतिपादन केले तर या प्रसंगी दुस-या दिवशी या कार्यक्रमाकरीता मा. किशोरभाऊ जोरगेवार आमदार, चंद्रपुर विधानसभा तसेच शिवानीताई वड्डेटिवार यांनी हजेरी लावली या प्रसंगी बोलतांना किशोरभाऊ ‘जोरगेवार यांनी मुस्लीम समाजाच्या प्रत्येक कार्यत सहभागी राहुन, समाजाच्या प्रत्येक कार्यात मदत करण्याचे आश्वासन दिले तर शिवानी ताई वड्रेटिवार यांनी सुध्दा आले मनोगत व्यक्त करत मुस्लीम समाजाच्या या उपक्रमाबद्दल अल्पसंख्याक विकास मंचाचे कौतुक केले, व दरवर्षी समाजाचा अश्या प्रकारचा मेळाच्याचे आयोजन करण्याचा मौलीक सल्ला या प्रसंगी दिला.

अल्पसंख्याक विकास मंचाचे अध्यक्ष यांनी उपस्थित मान्यवरासमोर समाजाला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर समाजाला आरक्षणाची मोठी गरज आहे. व आरक्षण मिळवुन घ्यायचे असेल तर समाजाला एकसंघ होणे गरजेचे असल्याचे मनोगत व्यक्त केले, व समाजाकरीता लायब्ररी, मदरसेच्या सशक्तीकरणाकरीता शासनाने अनुदान गरज असल्याची मत त्यांनी व्यक्त केले. त्याच प्रमाणे मुस्लीम समाजातील शासकीय नोकरीचा टक्का वाढवीण्याकरीता लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करण्याबाबतचे मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमात जवळपास २०० उपवधु-उपवरांनी आपला परिचय दिला तर या माध्यमातुन जवळपास ३० ते ३५ नाते जोडले गेले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता अल्पसंख्याक विकास मंचाचे अध्यक्ष श्री मतीनजी शेख, बाबा भाई, सैयद अतीक भाई, रमजान सर, खालीक भाई, मुश्ताक खॉन, ताहेर भाई, मुश्ताकभाई (बेरींगवाले) अफरोज पठाण, राजु निसार, सलीम बेग, डॉ. अनीस खॉन, अशपाक भाई, नाहीत काझी, नियाज कुरेशी, शिरीन खॉन, शबनम मॅडम, यांनी मेहनत घेतली या प्रसंगी बहुसंख्येने मुस्लीम बांधव उपस्थित होते. या प्रसंगी महीलांची उपस्थिती ही मोठया संख्येने होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये