ताज्या घडामोडी

एस टी बसने दुचाकीस्वाराला चिरडले – युवकाचा जागीच करुण अंत

बल्लारपूरच्या युवकाचा कोरपन्यात मृत्यु

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

किनवट आगाराच्या एस टी बसने दुचाकीला चिरडल्याची दुर्दैवी घटना कोरपना तालुक्यात घडली असुन अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला.

प्राप्त माहितीनुसार कोरपना येथुन बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथिल निखिल कोंडेकर हा युवक दुचाकीने गडचांदुर कडे येत होता दरम्यान किनवट आगाराची किनवट चंद्रपूर बस क्र. MH20 BL 1650 देखिल चंद्रपूर कडे येत असताना सायंकाळी 7:30 वाजताच्या दरम्यान लालगुडा येथील हनुमान मंदिराजवळ बस ने दुचाकीला चिरडल्याने दुचाकीस्वार युवक निखिल कोंडेकर जागीच मृत्युमुखी पडला. अपघाताची माहिती कळताच कोरपना पोलीस घटनास्थळी पोहचले असुन पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये