ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ओबीसींच्या अधिकारासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाधिवेशनात सामील व्हा – डॉ बबनराव तायवाडे

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय महाअधिवेशन अमृतसर (पंजाब) येथे आयोजीत

चांदा ब्लास्ट

दिनांक ७ आँगस्त २०२४ ला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे ९ वे राष्ट्रीय अधिवेशन अमृतसर, पंजाब राज्यात येथे आयोजीत करण्यात आले आहे. सदर अधिवेशनाच्या तयारीच्या दृष्टीने नागपूर येथे रविवार दिनांक ५ मे २०२४ बैठकीचे आयोजन धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर दुपारी १२ वाजता बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते, या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. केंद्रामध्ये स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.ओबीसी समाजाला लावण्यात आलेली क्रीमिलेयरची घटनाबाह्य अट त्वरित रद्द करण्यात यावी व ती रद्द होईपर्यंत क्रीमिलेयरची मर्यादा २० लाख रुपये करण्यात यावी. मंडल आयोग आणि स्वामिनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्या. ओबीसी प्रवर्गाचा अँट्रासिटी कायद्यामध्ये समावेश करण्यात यावा. इतर मागण्या मजूर करून घेण्यासाठी आणि राष्ट्रिय ओबीसी महासंघाच्या वर्षभरातील कार्यक्रम ठरविण्यासाठी,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजीत करण्यात आली होती. अध्यक्षीय भाषणात बोलताना मनाले की आपल्या अधिकारासाठी महाधिवेशनात सामील व्हा असे आवाहन केले.

     बैठकीचे प्रास्ताविक करताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय महासचिव सचिन राजूरकर यांनी आज पर्यंत झालेल्या अधिवेशन बद्दल माहिती दिली, बैठकीत समन्वयक डॉ.अशोक जिवतोडे, उपाध्यक्ष शेषराव येलेकर, कोषाध्यक्ष गुनेश्वर आरिकर, सहसचिव शरद वानखेडे, राज्य उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, अध्यक्षा महीला महासंघ सुषमाताई भड, महाराष्ट्र महिला अध्यक्ष ज्योति ताई ढोकने, राष्ट्रीय युवा अध्यक्ष, सुभाष घाटे, ऋषभ राऊत, परमेश्वर राऊत, रुंदाताई ठाकरे, विदर्भ कार्याध्यक्ष शकील पटेल, ओबीसी योध्दा रवींद्र टोंगे, विनोद हजारे, शुभम वाघमारे निलेश खोडे, पराग वानखेडे, रुतीका डफ, नागपूर जिल्हा युवा अध्यक्ष अनिलभाऊ चानपुरकर, वीरश्रीताई चानपुरकर, अफसाना पठाण, चन्द्रशेखर राऊत, अरुण कैकाडे, राजेश भुते, तुषार दुरबुडे,सतीश सातपुते, प्रविण सातपुते,पंकज गौर, पराग वानखेडे,सूरज नेवारे, व ओबीसी महासंघ,महिला महासंघ, युवा – युवती महासंघ, कर्मचारी महासंघ, किसान महासंघ, विद्यार्थी महासंघ, वकील महासंघ तसेच सर्व राष्ट्रीय पदाधिकारी, महाराष्ट्र कार्यकारिणी, विदर्भ कार्यकारिणी, सर्व जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष व सर्व कार्यकर्त् बैठकीला उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये