ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांनी संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढा देणे गरजेचे – रविकांत तुपकर

शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपा निमित्त एल्गार सभा.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. गणेश टोगे

विदर्भातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकरिता लढा उभारण्याची घोषणा

शेतकर्‍यांची परिस्थिती अतिशय वाईट असून सोयाबीन,कापूस व इतर शेतीपिकांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली. गेल्या वर्षांचा पीकविमा व दुष्काळाची मदत अद्याप मिळालेली नाही. अशा परिस्थितीत सरकार मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांनी संघटीत होवून मोठा लढा देणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी शेतकरी संघर्ष यात्रेच्या समारोपीय एल्गार सभेत केले.

युवा संघर्ष मोर्चाच्या वतीने देवळी तालुक्यातील विविध गावांमध्ये मोटारसायकलने तीन दिवसीय शेतकरी संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शेतकऱ्यांना संघटित करून सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शेतमालाची भाव वाढ व विविध प्रश्नांना घेऊन शेतकऱ्यांचा लढा उभारण्याच्या उद्देशाने ही शेतकरी संघर्ष यात्रा काढण्यात आली. या यात्रेची सुरवात दि. २६ जानेवारी रोजी देवळी येथून झाली. पाहिल्या दिवशी ही यात्रा अनेक गावातून मार्गक्रमण करीत भिडी येथे पोहचली. त्या ठिकाणी किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अविनाश काकडे यांची जाहीर सभा होऊन यात्रेचा पहिला मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी ही यात्रा अनेक गावांमध्ये बैठका घेत गौळ येथे पोहचली. त्या ठिकाणी शेतकरी नेते विजय जावंधिया यांची सभा पार पडली. तिसऱ्या व शेवटच्या दिवशी ही यात्रा देवळी येथे पोहचली. या यात्रे मध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर स्वतः सहभागी झाले. ही यात्रा सभा स्थळी पोहचल्या नंतर शेतकऱ्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले. व शेतकऱ्यांनी रविकांत तुपकर यांना खांद्यावर उचलून सभा स्थळापर्यंत आणले. श्री.किरण ठाकरे व त्यांचे तरुण सहकारी शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर अतीशय तळमळीने काम करत आहेत, याचे कौतुक करीत येणाऱ्या काळात राज्यभरात विविध ठिकाणी शेतकर्‍यांसाठी काम करणार्‍या चांगल्या विचाऱ्यांच्या तरुणांची मोट बांधून एक मोठी लढाई उभी करण्याचा निर्धार त्यांनी हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत एल्गार सभेत केला. तसेच विदर्भातील सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्कासाठी येणाऱ्या काळात मोठा लढा उभा करण्याचा मानस व्यक्त केला. कडाक्याच्या थंडीत या एल्गार सभेला देवळी तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी युवा संघर्ष मोर्चाचे अध्यक्ष किरण ठाकरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून या शेतकरी संघर्ष यात्रेचा उद्देश व ही यात्रा आजच्या काळातील शेतकऱ्यांना संघटित करून त्यांच्या हक्कासाठी लढा उभारण्याच्या दृष्टीने काढल्याचे मत व्यक्त केले. यावेळी मंचावर अविनाश काकडे, सुदाम पवार, प्रविण कात्रे, गौतम पोपटकर, समीर सारजे, लोमहर्ष बाळबुधे, स्वप्नील मदनकर,ऍड.मंगेश घुंगरूड, संदीप दिघीकर, मनोज नागपुरे, अशोक पवार, सागर दुधाने उपस्थित होते.

या तीन दिवसीय शेतकरी संघर्ष यात्रेत गौरव खोपाळ, वैभव नगराळे, तुषार झोड, दिलीप बाळबुधे,ऍड. मंगेश राऊत, अमोल भोयर, विनय महाजन, अक्षय कोठेकर, प्रमोद भेंडे, राहुल सारजे, मारोतराव घोडाम, अजय पांडे, प्रदीप खैरकार, मनीष पेटकर, वृषभ गावंडे, सुरज भगत, अविनाश धुर्वे, उमेश बोरकर, नितेश खारकर, नितीन काळे, नारायण राऊत, रुपेश कडू, कमलेश पाटील, शरद भोयर, हणू पचारे, अमोल मानकर, अनुप खापरकर, तुषार भोयर समीर इंगोले, मनोज अहल्ले यासह अनेक शेतकरी या यात्रेत सहभागी झाले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये