ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एक्सप्रेस रेल्वे गाड्यांचा थांबा भांदक रेल्वे स्टेशनला द्या!

विविध समित्यांची निवेदनाद्वारे रेल्वे महाप्रबंधकांना मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

रेल्वे महाप्रबंधक रामकरण यादव मध्य रेल्वे मुंबई हे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना ताडाली रेल्वे स्टेशन येथे दि.०८ डिसेंबर २०२३ ला दुपारी १ वाजता त्यांना प्रत्यक्ष भेटून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख नंदू पढाल व शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांच्या नेतृत्वात भद्रावती करांच्या रेल्वे समस्या संदर्भात चर्चा करून निवेदन देण्यात आले.

या निवेदनात ग्रँड ट्रॅक एक्सप्रेस, नवजीवन एक्सप्रेस, दानापूर एक्सप्रेस व अंदमान एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा अप आणि डाऊन रेल्वे थांबा भांदक रेल्वे स्टेशनला देण्यात यावा तसेच काजीपेट पुणे ही एक्सप्रेस साप्ताहिक आहे, तीला दैनंदिन करण्यात यावे व नागपूर मुंबई सेवाग्राम एक्सप्रेस या गाडीला बल्लारशा पॅसेंजर सोबत मुंबईला जाणारे डबे वर्धा रेल्वे स्थानकावरून पूर्ववत जोडल्या जावे या मागण्या प्रामुख्याने करण्यात आल्या.

भद्रावती ही ऐतिहासिक नगरी असून पर्यटन स्थळ सुद्धा आहे. या शहरांमध्ये आयुध निर्माणी व कोळसा खाणी असल्यामुळे अनेक राज्यातील लोक या शहरात राहतात. त्यांच्या सुविधेसाठी वरील मागण्यांचे निराकार होणे अत्यंत आवश्यक आहे. हे त्यांना पटवून देण्यात आले. याप्रसंगी समस्त व्यापारी असोसिएशन भद्रावतीचे उपाध्यक्ष अखिल शेख व शैलेश कोठारी, परिवर्तन ऑटो युनियन भद्रावती चे अध्यक्ष कल्याण मंडळ तसेच हनुमान जन्मोत्सव समिती भद्रावतीचे पवन हुरकट उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये