ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“एक हात मदतीचा” अंतर्गत ट्रस्टव्दारा रुग्णास आर्थीक मदत

ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

ट्रस्टच्या उपक्रम अभियानाचा लाभ गरीब गरजुनी घ्यावा : अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले

 तालुक्यातील पिपरी (देशमुख) येथील रुग्ण प्रमोद संभाजी नवघरे यांना उपचाराकरीता स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर चे उपक्रम “श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान” अंतर्गत आर्थीक सहकार्य करण्यात आले.

 स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट हि एक सामाजिक संस्था असून समाजातील गोरगरीब-गरजू व्यक्ती, अनाथ विद्यार्थी, गरीब शेतकरी तसेच समाजातील दुर्बल घटक यांना न्यासच्या माध्यमातून आर्थिक सामाजिक मदत करीत असते. ट्रस्टच्या उद्देशानुरूप समाजाच्या मदतीकरीता वेगवेगळे असे मुख्य सात अभियान राबवीत आहे.

 समाजातील दिन-दुबळे, गरीब-गरजू, पिडीत-शोषीत, शेकरी-शेतमजुर, निराधार, दिव्यांग, महिला, विद्यार्थी, गंभीर आजारी रुग्ण आदीसाठी ट्रस्टव्दारे विविध योजना उपक्रम चालविल्या जात आहेत. यामध्ये श्रध्देय बाबा आमटे आरोग्य अभियान, विदेही सदगुरु श्री संत जगन्नाथ महाराज जनजागृती व प्रबोधन सामाजिक उपक्रम, स्व. सिध्दुताई सपकाळ शैक्षणिक पाल्य दत्तक योजना, कै. म.ना. पावडे क्रिडा स्पर्धा योजना, डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्यार्थी कल्याण योजना, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शिक्षण संमृध्दी योजना, हिंदुहृद्य वंदनीय बाळासाहेब ठाकरे दिव्यांग योजना असून याचा नागरीकांनी लाभ सुध्दा मिळत आहे.

 ट्रस्टव्दारा चालविण्यात येणारे उपक्रम अभियानांचा समाजातील नागरीकांनी लाभ घेण्याकरीता संपर्क करण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले यांनी यावेळी सांगीतले आणी ट्रस्ट गरजू, गरीब नागरीकांना नक्कीच मदत करणार असल्याचे आश्वासन दिले.

 याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, ट्रस्टच्या कोषाध्यक्षा सुषमा शिंदे सोबतच संस्थापक सदस्य तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) वरोरा विधानसभा प्रमुख रविंद्र शिंदे, ट्रस्टचे कार्यवाहक अनुप कुटेमाटे, माजी नगरसेवक प्रशांत कारेकर तसेच ट्रस्टचे गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये