ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातील ६ पोलीस अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ संपन्न!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलात आपली प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवा बजावून ६ पोलीस अधिकारी व अंमलदार काल दि ३०-०६-२०२६ रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या सर्व सेवानिवृत्त सहकाऱ्यांचा भव्य निरोप समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालय, वर्धा येथील ‘क्राईम मीटिंग हॉल’ मध्ये अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या निरोप समारंभाला सेवानिवृत्त अधिकारी, कर्मचारी व त्यांचे संपूर्ण कुटुंबिय सन्मानाने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व सेवानिवृत्तांचा त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व अंमलदारांची नावेः

१. श्रेणी पोउपनि / ११४८ करूणा एस. मुसळे (पो. स्टे. हिंगणघाट)

२. श्रेणी पोउपनि / १३१ राजेश के. ठाकरे (पो. स्टे. गिरड)

३. श्रेणी पोउपनि / १६५ विजय कृष्णराव कडु (ATB)

४. श्रेणी पोउपनि / ८३ नारायण सी. काळे (पो. स्टे. सेलु)

५. श्रेणी पोउपनि / २२९ विवेकानंद के. धनुले (सावंगी)

६. सफौ / ५३ वासुदेव बिसनराव तायवाडे (पो. स्टे. कारंजा)

कर्तव्यभावनेचा गौरव व पुढील वाटचालीस शुभेच्छाः

समारंभादरम्यान बोलताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. “पोलीस दलात नोकरी करताना कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र जनतेचे रक्षण करणाऱ्या या सहकाऱ्यांचे योगदान वर्धा पोलीस दल कधीही विसरणार नाही,” अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. उपस्थितांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील कौटुंबिक, सामाजिक आणि निरामय आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्तांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

(आशिष चिलांगे) सहायक जनसंपर्क अधिकारी,

पोलिस अधीक्षक कार्यालय वर्धा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये