अवैद्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक
एकूण ७ लाख ७० हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 01.06.2025 रोजी मा. पोलीस अधीक्षक सा,व मा. अप्पर पोलीस अधीक्षक सा. यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस अधीक्षक, राहुल चव्हाण, साहेब पुलगांव यांचे पथकातील पोउपनि सुधिर बनकर सोबत पोशि/635 संदीप बोरबन, पोशि/1464 रामदास दराडे यांनी पोलीस स्टेशन देवळी हद्दीतील आरोपी हे संगनमत करून अवैद्यरित्या रेती चोरून वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने नमुद आरोपीतांनावर नमुद घटना ता. वेळी व स्थळी छापा टाकुन 01 ट्रॅक्टर चालक व मालका यांना ताब्यात घेवुन त्यांचे विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दोन पंचासमक्ष ट्रॅक्टर व ट्रॉलीसह 7,07,000/-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
सविस्तर असे की,नमुद घटना ता. वेळी व स्थळी यातील नमुद आरोपीतांवर गुप्त बातमीदार कडुन मिळालेल्या माहीती वरून रेड केला असता आरोपी 1. अमोल पुरूषोत्तम इंगोले, 2. सागर महादेवराव शिंगाडे दोन्ही रा.वडद ता.देवळी जि. वर्धा हे संगनमताने आपले ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॅाली ने अवैधरित्या रेती चोरून वाहतुक करीत असतांना वडद रोडवर 1 ट्रॅक्टर वाहतुक करतांना मिळुन आल्याने ट्रॅक्टर चालक व मालका विरूध्द कायदेशीर कार्यवाही करून दोन पंचासमक्ष घटनास्थळ जप्तीपंचनामा कार्यवाही प्रमाणे एकुण जुमला किंमत 7,07,000/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.