ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शालेय स्कुल बस/स्कुल व्हॅन चालकांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी

पाहा, कुठे आहेत - शिबिराचे ठिकाण व दिनांक/वेळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सद्यस्थितीत राज्यामध्ये होणाऱ्या गंभीर अपघाताचे विश्लेषण केल्यास बसेसच्या अपघातामध्ये होणारी जीवित हाणी सर्वाधिक आहे. ही मोठया प्रमाणावरील जीवित हाणी टाळण्यासाठी वाहन चालकांचे संपुर्ण आरोग्य तसेच वाहन चालकाच्या दुष्टीस अनन्यसाधारण महत्व आहे.

चालकाला कुठल्याही प्रकारची व्याधी अथवा दुष्टीदोष असेल तर वाहन चालवितांना अडचणी येत असतात परिणामी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. करीता सर्व प्रकारच्या बसचालकांची आरोग्य व नेत्र तपासणी होणे आवश्यक आहे.

या करीता मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.पआका/र.सु.क/न.क्र.- ८९ / २०२३ / नेत्र तपासणी आरोग्य शिबीर / २०२३ / जा.क्र.८१४० दिनांक १३.०७ २०२३ नुसार उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वाहन चालकांची नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करण्याकरीता बॅच बिल्ला असलेल्या बस चालकांनी खालील ठिकाणी उपस्थित राहुन नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करुन घेण्यात यावी असे आवाहन उप प्रादेशिक परिहवन कार्यालय, वर्धा यांच्याकडुन करण्यात येत आहे.

अ.क्र.           शिबिराचे ठिकाण          दिनांक/वेळ

१. सामान्य रुग्णालय, (नेत्ररोग विभाग) वर्धा, दि. २३.०८. २०२३ वेळ १०.०० ते ३.००

२. सामान्य रुग्णालय, (नेत्ररोग विभाग) वर्धा, दि. २४.०८. २०२३ वेळ १०.०० ते ३.००

३. उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट, दि. २५.०८.२०२३ वेळ १०.०० ते ३.००

४. उपजिल्हा रुग्णालय, हिंगणघाट, दि. २६.०८.२०२३ वेळ १०.०० ते ३.००

५. उपजिल्हा रुग्णालय, आर्वी, दि. २५.०८.२०२३ वेळ १०.०० ते ३.००

      तरी आपल्या मार्फत जास्तीत जास्त वाहना चालकांना नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिरात उपस्थित राहण्यास प्रोत्साहीत करावे. असे खाजगी बस चालक मालक संघटना वर्धा यांना मो समीर मो याकूब उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये