Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

रस्ता दुभाजकावर आढळले मृत नवजात अर्भक – घटनेने शहरात एकच खळबळ

मागील काही काळात शहरातील तिसरी घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

अतुल कोल्हे, भद्रावती

शहरातील मुख्य रस्त्यावरील जंगल नाका परिसरातील रस्ता दुभाजकावर आज दि. 22 रोज मंगळवार ला सकाळी 10.00 वाजताचे दरम्यान नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हे अर्भक पुरुष जातीचे आहे.

सदर घटनेची माहिती पोलिसांना कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक ती कारवाई करीत पंचनामा केला व मृत अर्भकाला पुढील तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. ही सर्व घटना प्रत्यक्ष दर्शनींनी दिलेल्या माहितीनुसार एका कुत्र्याने हे मृत अर्भक तोंडात पकडून आणले होते. नागरिकांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला असता त्या कुत्र्याने हे अर्भक तेथेच टाकून पळ काढला.

शहरात नवजात अर्भक सापडल्याच्या दोन घटना या आधी सुद्धा घडल्या आहे. त्यात चंडिका मंदिराजवळ एक जिवंत नवजात अर्भक सापडले होते तर दुसरे नगरपालिकेच्या घंटा गाडीमध्ये एक मृत अर्भक आढळले होते. आता या कुत्र्याने आणून टाकलेल्या अर्भकाच्या आईचा छडा लागेल का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये