देऊळगाव राजाच्या आठवडी बाजारातील KMCR गॅरेजमधून दोन लाखांचा ट्रक चोरीला; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
गॅरेजमध्ये उभा केलेला दहा चाकी ट्रक रातोरात गायब; देऊळगाव राजा शहरात खळबळ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : शहरातील आठवडी बाजार परिसरात असलेल्या KMCR गॅरेजमधून जुना टाटा कंपनीचा दहा चाकी ट्रक अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. एमएच-२०-एटी-९९६९ क्रमांकाच्या या ट्रकची अंदाजे किंमत दोन लाख रुपये असून, या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रात्रीच्या सुमारास ट्रक चोरीला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुफरान महेमुद पटनी (वय ३०, व्यवसाय चालक, रा. नॅशनल नगर, जालना) यांच्या मालकीचा जुना टाटा कंपनीचा 2015 मॉडेलचा दहा चाकी ओपन बॉडी ट्रक देऊळगाव राजा येथील आठवडी बाजार परिसरातील KMCR गॅरेजमध्ये होता.
९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ११ वाजेपासून १० ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात व्यक्तीने हा ट्रक चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. सकाळी ट्रक जागेवर नसल्याचे लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली.
ट्रकची किंमत दोन लाख रुपये
चोरीला गेलेल्या ट्रकचा क्रमांक एमएच-२०-एटी-९९६९ असा असून, तो टाटा कंपनीचा जुना २o१५ मॉडेलचा दहा चाकी ओपन बॉडी ट्रक आहे. या वाहनाची अंदाजे किंमत दोन लाख रुपये असल्याचे पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. वाहनाची ओळख पटविण्यासाठी त्याचा चेसिस क्रमांक MAT426023A7A04053 आणि इंजिन क्रमांक B5.9145201A62832851 नोंदविण्यात आला आहे.
अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल
या प्रकरणी गुफरान पटनी यांच्या तक्रारीवरून १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून ८ मिनिटांनी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कायम गुन्हा क्रमांक ४५६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीच्या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहोळकर करीत आहेत. ट्रकचा शोध घेणे आणि चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा माग काढणे, या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे..



