ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, येथे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती आज साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे ,एमसीवीसी विभाग प्रमुख प्राआरजू आगलावे मॅडम समिती प्रमुख प्रा सौ नंदा अवघडे मॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी प्रा वाढई यांनी डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन कुमारी रागिनी पेंदोर , यांनी केले तर आभार प्रदर्शन युवराज कांबळे यांनी केले या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये