ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जुना कोंढा येथे अवैध देशी दारू विक्रीवर भद्रावती पोलिसांची कारवाई

पाणटपरीतुन २ हजार ४०० रुपयांचची देशी दारू जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात कारवाई करत पोलिसांनी जुना कोंढा येथील एका पाणठेल्यावर धाड टाकून देशी दारूचा साठा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टोबर २०२६ रोजी भद्रावती पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार परिसरात गस्तीवर असताना, जुना कोंढा येथील राहुल दिलीप चव्हाण हा त्याच्या पाणठेल्यावर बेकायदेशीरपणे देशी दारूची विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन पंचांसमक्ष संबंधित पाणठेल्याची कायदेशीर झाडाझडती घेतली.

झाडाझडतीदरम्यान पाणठेल्यातून ९० मि.ली. क्षमतेच्या ‘रॉकेट संत्रा’ कंपनीच्या ६० सिलबंद बाटल्या आढळून आल्या. त्यांची एकूण किंमत २ हजार ४०० रुपये असून, पोलिसांनी हा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्ती पंचनामा करून ताब्यात घेतला.

या प्रकरणी पोलीस हवालदार निखिल पुंडलीकराव कौरासे यांच्या तक्रारीवरून राहुल दिलीप चव्हाण (वय २९, रा. जुना कोंढा, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये