ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घोडपेठ चौकात मटका जुगारावर भद्रावती पोलिसांची धाड

आरोपीकडून १,१०० रुपये व सट्टा-पट्टीचे साहित्य जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात कारवाई सुरू असताना घोडपेठ चौकात मटका सट्टा चालविणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत आरोपीकडून रोख रक्कम १,१०० रुपये, बॉलपेन आणि सट्टा-पट्टीचे साहित्य असा एकूण १,१२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, १४ ऑक्टो२०२६ रोजी भद्रावती पोलिसांचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर असताना, मौजा घोडपेठ येथील चौकात सार्वजनिक ठिकाणी एक व्यक्ती पैशांची हारजीत लावून ‘कल्याण’ व ‘राजधानी’ मटका सट्ट्याचे आकडे लिहून जुगार खेळवत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी धाड टाकली. यावेळी शुभम उर्फ भोला बालाजी कळसकर (वय २७, रा. पंचमुखी चौक, घोडपेठ, ता. भद्रावती, जि. चंद्रपूर) याला रंगेहात ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून कल्याण व राजधानी सट्ट्याचे आकडे लिहिलेले पाच कागदी चिटोरे, निळ्या शाईचे जुने वापरते बॉलपेन आणि १,१०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस हवालदार प्रशांत पुंडलिक शेंदरे यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार प्रशांत शेंदरे, पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार, पोलीस हवालदार देवानंद डुकरे, पोलीस शिपाई योगेश घाटोळे, पोलीस शिपाई खुशाल कावळे, पोलीस अंमलदार संतोष राठोड आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली गारघाटे यांच्या पथकाने केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये