ताज्या घडामोडी

धनगर समाजाला एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री यांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना भद्रावती तहसीलदार यांच्या मार्फत महाराष्ट्र धनगर समाज महासंघ च्या वतीने धनगर ST आरक्षण अंमलबजावणी करण्याकरिता आज धनगर समाज बांधवानी निवेदन देण्यात आले.

       तमाम महाराष्ट्रातील धनगर जमातीच्या प्रलंबित व न्याय्य मागण्यांकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रमुख मागण्या शासनाकडे सादर केले यामध्ये धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करिता शासनाने धनगर आरक्षणाच्या समर्थनार्थ ठोस, सकारात्मक आणि सर्व कायदेशीर व घटनात्मक बाबी स्पष्ट करणारे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात दाखल करून शासनाने अनुभवी व सक्षम वकिलांची नियुक्ती करून सर्वोच्च न्यायालयात धनगर जमातीची बाजू प्रभावीपणे मांडावी, धनगर ST आरक्षणाबाबत कोणताही प्रतिकूल निर्णय आला तर धनगरांना ST चे प्रमाणपत्र देण्यासाठी ‘प्लॅन बी’ तयार करावा, श्री संत बाळूमामा देवस्थानासाठी स्वतंत्र कायदा देण्यात यावे., मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील Missing Link ला स्वातंत्र्यवीर शिंग्रोबा धनगर यांचे नाव देण्यात यावे.,

मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे., धनगर जमातीच्या न्याय्य हक्कासाठी वरील मागण्यांवर शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेणे. असे तहसीलदार भद्रावती यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी वासुदेव आस्कर, डॉ. नामदेवराव ढवळे, गुलाबराव चिडे, अंबादास इखारे, रमेश उरकुडे, श्रीहरी घोटकर, पंढरी बोधे, दिलीप चामाटे, ज्ञानेश्वर घोरपडे, संदीप मंदे, गजानन डवरे, दिपक घोरुडे, छायाताई घोरुडे, रेखाताई मोंढे, ज्योतीताई बिटे, प्रीती झालेवडे, गुंफा उरकुडे, सुमतताई खरे, सुमन डवरे, महादेव बरडे उपस्थित होतें.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये