ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एन.एस.जी.एस. इंटरनॅशनल कॉन्व्हेंट स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितेश मेश्राम यांची निवड

आष्टी येथील शाळेत पालकांचा विश्वास; सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

आष्टी येथील एन.एस.जी.एस. इंटरनॅशनल कॉन्व्हेंट स्कूलच्या शाळा व्यवस्थापन समितीची निवड नुकतीच पार पडली. या समितीच्या अध्यक्षपदी नितेश मेश्राम यांची निवड करण्यात आली आहे.

याप्रसंगी संस्थेच्या संचालिका अर्चना निमसरकार, मुख्याध्यापिका मनीषा निमसरकार, शिक्षकवृंद तसेच पालकवर्ग उपस्थित होता. सर्वांच्या उपस्थितीत नितेश मेश्राम यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नितेश मेश्राम यांनी यापूर्वीही शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कार्यरत राहून शाळेच्या विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या हितासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत पालकांनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त करीत अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.

शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, पालक व शिक्षक यांच्यात समन्वय साधणे तसेच शाळेच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविणे, या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीची भूमिका महत्त्वपूर्ण असते.

नितेश मेश्राम यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या संचालिका, मुख्याध्यापिका, शिक्षकवर्ग आणि पालकांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली शाळा व्यवस्थापन समिती अधिक प्रभावीपणे कार्य करेल, असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

नितेश मेश्राम यांच्या निवडीमुळे आष्टी परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व पालकांनी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये