ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, ॲम्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे चालक व मालक आणि गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे बैठक संपन्न…

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आगामी सण, उत्सवाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच ध्वनी प्रदूषणास प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने वर्धा जिल्ह्यातील ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, ॲम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे चालक व मालकांची तसेच गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची बैठक आज दि. ०५.०९.२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांचे अध्यक्षतेत पोलीस अधीक्षक कार्यालय वर्धा येथे आयोजित करण्यात आली.

बैठकी दरम्यान श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी ध्वनी प्रदुषणाबाबत ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम, २०००, मा. सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे निर्देश तसेच शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या प्रचलित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या तसेच कुणीही विहीत मर्यादेपेक्षा अधिक आवाजात ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, ॲम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचा वापर करुन नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची स्पष्ट सूचना बैठकीदरम्यान देण्यात आली. चालक व मालकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून गणेशोत्सवाच्या अनुषंगाने येणाऱ्या अडचणी व सूचना जाणून घेण्यात आल्या. तसेच गणेशोत्सव कालावधीत कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियोजन, ध्वनी प्रदूषण नियंत्रण, ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, ॲम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे वापर, मंडप उभारणीसाठी आवश्यक परवानग्या, CCTV कॅमेरे, विद्युत व गणेश विसर्जन मिरवणूक तसेच विसर्जन व गर्दी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पोलीस अधीक्षक वर्धा यांचे कडुन ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, ॲम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे वापर बाबत कलम ३६, ३८ (१) मपोका १९५१ अन्वये संपुर्ण जिल्हयात दि. ०५.०९.२०२६ चे ००.०१ वा. ते दि. २९.०९.२०२६ चे २४.०० वा. पर्यंत आदेश पारीत करण्यात आल्याबाबत माहिती देण्यात आली तसेच संपूर्ण वर्धा जिल्हयात मा. जिल्हाधिकारी, वर्धा यांनी दि. ०४.०९.२०२६ ते २८.०९.२०२६ पर्यंत लेझर लाईट वापरास प्रतिबंध बाबत आदेश पारीत केल्याबाबत माहिती दिली. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मा. पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले. वर्धा जिल्हा पोलीसांकडुन अगामी गणेशोत्सव दरम्यान “गणराया उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धा-२०२६” चे आयोजन करण्यात आले असुन सायबर सुरक्षीत गणेशोत्सव, अंमली पदार्थ विरोधी अभियान, महिला व बाल सुरक्षा, वाहतुक सुरक्षा, पर्यावरण पूरक गणेशोत्सव, आरोग्य तपासणी शिबीर, कायदा व सुव्यवस्था शिस्त या विषयावर स्पर्धा आयोजीत केली असुन प्रत्येक पो.स्टे. स्तरावर व पोलीस अधीक्षक कार्यालयस्तरावर ३ उत्कृष्ट गणेश मंडळ यांना पारीतोषीक देवुन सन्मान करणार असल्याची माहिती दिली.

श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा यांनी सण-उत्सव शांततेत, उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी ध्वनीक्षेपक, लाऊडस्पिकर, ॲम्प्लीफायर व इतर ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांचे चालक व मालकांनी व गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे व ध्वनी प्रदूषण नियंत्रण ही सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांच्या आरोग्याचा, शांततेचा व सुरक्षिततेचा विचार करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन वर्धा जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

सदर बैठकीस श्री. सदाशिव वाघमारे, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर, पोलीस उपअधीक्षक (गृह), वर्धा तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार वर्धा जिल्हा व जिल्हयातील ध्वनीक्षेपक चालक मालक व गणेश मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये