खंडणी मागणाऱ्या इसमावर सेलू पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज वाघोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक 04/09/2026 रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन सेलू येथे येवून तक्रार दिली की, त्यांना व त्यांचे मित्राला आरोपी नामे मंगेश विठ्ठलराव चौरे रा. नेरी पुनर्वसन सालोड, ता.जि. वर्धा हा जिवे मारण्याचे व मर्डर करण्याची तसेच बदनामी करण्याची भिती दाखवून पैसे मागत आहे तू अवैध्य व्यवसाय करतो अशा खोट्या व निराधार बातम्या सोशल मिडियावर आणि वेगवेगळ्या ग्रुप वर व्हायरल करण्याची व जिवे मारण्याची धमकी देत होता. त्यामुळे फिर्यादी यांनी घाबरून आरोपीला 50,000 रुपये दिले. आरोपी फिर्यादीस आणखी पैशाती मागणी करत असल्याने व पैसे दिले नाही तर जिवे मारण्याची व सोशल मिडियावर फिर्यादी व फिर्यादीच्या मित्र व कुटुंबाची समाजात बदनामी करण्याची आणि सोशल मिडियावर बदनामी करण्याची धमकी देऊन खंडणी उकळल्याने आणि वारंवार पैशाची मागणी करीत असल्याने असल्याबाबत तोंडी तक्रार दिल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन कलम 308(5) भा.न्या. संहिता 2023 अन्वये आरोपी नामे मंगेश विठ्ठल चौरे रा. नेरी पुनर्वसन सालोड याचे विरुध्द पोलीस स्टेशन सेलू येथे सदस्वा गुन्हा नोंद करुन तपासात आहे. सदर गुन्ह्याचा तपास श्री. पंकज वाघोडे सपोनि ठाणेदार पो. स्टे. सेलू, यांचे मार्गदर्शात पो. उपनि. उमेश उगले करिता आहे.
सदर आरोपीवर यापुर्वी वर्धा जिल्ह्यातील विवीध पोलीस स्टेशन मध्ये डिझेल चोरी, खंडणी मागणे, फसवणुक केल्याबाबत अनेक गुन्हे नोंद असून सेलू पोलीस स्टेशन तर्फे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, सदर आरोपी काही तक्रार असल्यास पोलीस स्टेशन सेलू येथे येवून तक्रार द्यावी किंवा स्वालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा.
1) स.पो.नि. पंकज वाघोडे ठाणेदार पो.स्टे. सेलू मो.क्र. 7304210724
2) पो.उपनि. उमेश उगले, मो.क्र. 9049394035
3) पोलीस अमंलदार अनिल केकतपुरे, मो.क्र. 9921007323
4) पोलीस अमंलदार रामकिसन इप्पर मो.क्र. 9823518582
5) पोलीस अमंलदार गजानन कामठाणे मो.क्र. 9834662846
(पंकज वाघोडे) सपोनि ठाणेदार
पो.स्टे. सेलू जि. वर्धा



