वर्धा जिल्ह्यात अगामी सर्वधर्मीय सण उत्सव पार्श्वभुमीवर लेझर लाईटच्या वापरास प्रतिबंध आदेश पारीत
पोलिस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील 32 नागरिकांना पोलिसांचे येणाऱ्या सणाच्या उत्साहाबद्दल केले आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी केले मार्गदर्शन…
वर्धा जिल्ह्यामध्ये आगामी काळात , पोळा, तान्हा पोळा, सार्वजनिक गणेशोत्सव,व हाडपक्या गणपती तसेच इतर सर्वधर्मीय सण व उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होणार आहेत. सदर सण-उत्सवांच्या कालावधीत मिरवणुका, धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात लेझर लाईट, हाय-पॉवर लेझर बीम व लेझर शो यांचा वापर करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.लेझर लाईटचा तीव्र प्रकाश मानवी डोळ्यांसाठी घातक ठरू शकतो. मिरवणूक अथवा कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित नागरिक व भाविकांच्या डोळ्यांवर लेझर लाईटचा थेट प्रकाश पडल्यास डोळ्यांच्या पडद्यावर (Retina) तसेच बुबुळावर (Cornea) गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
त्या अनुषंगाने वर्धा जिल्ह्याच्या मा. जिल्हाधिकारी वान्मथी सी मॅडम, वर्धा यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ चे कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून संपूर्ण वर्धा जिल्ह्यात दि. ०४ सप्टेंबर २०२६ चे ००.०१ वा. ते दि. २८ सप्टेंबर २०२६ चे २४.०० वा. या कालावधीत आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर लेझर लाईट, हाय-पांवर लेझर बीम व लेझर शो यांच्या वापरास प्रतिबंध करणारा आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
सदर आदेशाचा कालावधी पोळा, तान्हा पोळा व सार्वजनिक गणेशोत्सव या सण-उत्सवांच्या कालावधीस लागू राहणार आहे.
नागरिकांना आवाहन
वर्धा जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळे, उत्सव आयोजक, मिरवणूक आयोजक, डीजे/लाईट साऊंड व्यावसायिक तसेच नागरिकांनी सदर आदेशाचे काटेकोरपणे पालन करावे. कोणत्याही मिरवणुकीमध्ये अथवा सार्वजनिक कार्यक्रमामध्ये प्रतिबंधित प्रकारच्या लेझर लाईटचा वापर करू नये. सदर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आयोजकांविरुद्ध लागू कायद्यानुसार नियमानुसार कारवाई करण्यात येईल. सण-उत्सव शांततेत, सुरक्षित व उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे,
असे आवाहन श्री. सौरभ कुमार अग्रवाल, पोलीस अधीक्षक, वर्धा श्री सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा श्री सुनील महाडिक उपविभागीय पोलिस अधिकारी वर्धा यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर पोलीस स्टेशन सेवाग्राम यांनी पोलीस स्टेशन सेवाग्राम हद्दीतील पोलीस पाटील व नागरिकांना बोलावून सांगितले की आपल्या परिसरातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी या आदेशाचे पालन करावे लागणार आहे या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल असे आदेश देवेंद्र ठाकूर पोलीस निरीक्षक सेवाग्राम वाल्मिक बांबर्डे पोलीस उपनिरीक्षक सेवाग्राम शैलेश जगताप पोलीस उपनिरीक्षक सेवाग्राम नितीन राजपूत पोलीस हवालदार गोपनीय अंमलदार सेवाग्राम यांनी केलेले आहे आवाहन….



