ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाच्या वतीने शिक्षक दिन साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा तालुका सेवा निवृत्त कर्मचारी संघटना,सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, जेष्ठ नागरिक संघटना देऊळगाव राजा, जनसेवा सामाजिक संघटना यांच्या वतीने माजी उपराष्ट्रपती, शिक्षण तज्ञ ,भारतरत्न सर्वपल्ली राधाकृष्णन् यांची जयंती राष्ट्रीय शिक्षक दिन म्हणून आज विरंगुळा भवन येथे साजरां करण्यात आला. कार्यक्रमाचेअध्यक्ष म्हणून संघटनेचे अध्यक्ष बळीराम मापारी, होते ,तर प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रकाश खांडेभराड व अनिल कुळकर्णी होते

सर्वप्रथम सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी दिनकरराव जाधव,शांति लाल निरफळे, पंडितराव पाथरकर, रमेश नरोडे,प्रा.विजय रायमल प्रकाश अहिरे, बाबुलाल शिवरकर, गोविंद बोरकर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला व शिक्षक दिनाचे महत्त्व पटवून दिले,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघटक श्री प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव श्री गोविंदराव बोरकर यांनी केले शेवटी राष्ट्रगिताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये