महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे विद्यार्थी विकास विभाग (DSD) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र डी. देव होते, तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अनिस खान उपस्थित होते. यावेळी IQAC समन्वयक डॉ. आर. वाय. पटले, श्री. पवन चटारे, NSS समन्वयक श्री. चेतन वानखेडे, डॉ. मनोहर बांद्रे, DSD समन्वयक डॉ. अजय कुमार शर्मा, डॉ. संदीप घोडीले, श्री. चेतन वैद्य व डॉ. उत्कर्ष मून यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशंस्सा मोहितकर यांनी केली. टिपू हुसेन शेख यांनी शिक्षक दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. कु. प्रार्थना शर्मा (B.Sc.-I) व नेहा भोयर (M.Sc.-I) यांनी प्रार्थना सादर केली. कार्यक्रमाचा समारोप महक शेख यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.
यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते



