ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठावे — प्राचार्य प्रा. नानेश्वर धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती व महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. नानेश्वर धोटे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. छाया गायकवाड, प्रा. अंजना पवार, प्रा. सचिन धनवलकर, खुशी करमणकर व प्रतीक मून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. नानेश्वर धोटे यांनी, “स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी योग्य नियोजन, सातत्य, वेळेचे व्यवस्थापन, सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे,” असे आवाहन केले. तसेच शिक्षकांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर गाठून कुटुंबासह समाजाचे नाव उज्ज्वल करावे, असे त्यांनी सांगितले.

प्रा. छाया गायकवाड यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून घडणारे विद्यार्थी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देऊ शकतात, असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुमित जाधव यांनी केले. संचालन संदीप कांबळे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा पिंपळकर हिने केले. उत्साहपूर्ण वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये